Latest Marathi News
Ganesh J GIF

‘राज्यात ३ डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता, पोलीस स्टेशन्सला तसा अलर्ट आलाय’

महाराष्ट्रातील या नेत्यांचा धक्कादायक दावा, ६ डिसेंबरनंतर देशात काहीही होऊ शकत, म्हणाले 'भुजबळांना मी जेलबाहेर काढले'

पुणे दि २८(प्रतिनिधी)- राज्यात सध्या राजकीय आणि सामाजिक स्थिती अस्वस्थतेची झाली आहे. विविध आंदोलने आणि राजकीय घडामोडींमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पण आता यावर प्रकाश आंबेडकर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे यावर जोरदार चर्चा होत आहे.

राज्यात अनेक ठिकाणी ३ डिसेंबरनंतर दंगलींची शक्यता आहे. सगळ्या पोलीस स्टेशन्सला तसा अलर्ट आलाय, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. तसंच ६ डिसेंबरनंतर काहीही होऊ शकतं अशी पोलिसांना सूचना आहे, त्यामुळे चार राज्यांतील विधानसभा निवडणुका झाल्यानंतर काहीही होऊ शकते,असेही आंबेडकर म्हणाले आहेत. देशात मुस्लिम आणि ओबीसी समाजाला लक्ष्य केले जात आहे. समाजात अशांतता निर्माण केली जात असून आंदोलनाशी संबंध नसलेल्यांचा त्यासाठी वापर केला जात आहे, असा आरोप करतानाच आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी राहणार नाहीत, असा दावाही आंबेडकर यांनी केला आहे. तीन दिवसापूर्वी मुस्लिम संघटनेची बैठक मुंबईमध्ये झाली. ८ डिसेंबरला मुस्लिम संघटना पॅलेस्टाईन विषयावर आझाद मैदानावर सभा घेणार आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहे. पण मुस्लिम समाजाची सभा असल्याने भाजप त्याकडे वेगळ्या नजरेने पहात आहे. असेही आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान संविधान बदलणार नाही. असे फडणवीस म्हणाले, पण जोपर्यंत आरआरएसचे प्रमुख मोहन भागवत हे जोपर्यंत अस वक्तव्य करत नाही. तोवर आम्ही मान्य करणार नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कारागृहातून मीच बाहेर काढले. मात्र, त्यांनी त्याबाबत माझे कधी आभार मानले नाहीत. मलाही कोणाची गरज नाही. इतिहास सुधारून घ्या. मग कळेल… ओबीसी लढ्याचा जनक मी आहे” मंडल आयोगाबाबतचा इतिहास पाहा तुम्हाला कळेल असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!