हे ठाकरे भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा
मोदी आयो रे गाण्यामुळे भाजपा चर्चेला उधान, फडणवीसांबरोबर चर्चा
वाशिम दि ४(प्रतिनिधी)- आज राज्यात आणि केंद्रात भाजप सत्तेवर आहे. त्यामुळे अनेक नेत्यांचा भाजपात प्रवेश कल असतो.वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचा एक व्हिडिओ जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. त्यात ते भाजपात जाण्याचे संकेत देत आहेत.
चंद्रकांत ठाकरे हे राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. वाशिम जिल्ह्यातील ते महत्वाचे नेते म्हणून ओळखले जातात.ठाकरे यांचा एक व्हिडिओ जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत चंद्रकांत ठाकरे ‘मोदी आयो रे’ गाण्यावर डान्स करत आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे वाशिम जिल्ह्यात आले असताना ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यात आता हा डान्स व्हायरल झाल्याने भाजपा प्रवेशाच्या चर्चेला बळकटी मिळाली आहे. ठाकरे कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघातून २०२४ साठी इच्छुक आहेत. त्यासाठी ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
विशेष म्हणजे चंद्रकांत ठाकरे २०१९ सालीच कारंजा मतदारसंघातून आमदारीकीसाठी इच्छुक होते. पण एैनवेळी माजी आमदार प्रकाश डहाके यांना राष्ट्रवादीने पक्षात घेत तिकीट दिले होते. त्यात शरद पवारांमुळे अपक्ष ओढण्याची तयारी करणाऱ्या ठाकरेंना माघार घ्यावी लागली होती. पण आता होलिकोत्सव कार्यक्रमात केलेला डान्स त्यांची राजकीय वाटचाल ठरणार असल्याची चर्चा आहे.