Latest Marathi News

पोराला काॅपी द्यायला गेला बापाला पोलीसांनी धुतला

जळगाव जिल्ह्यात कॉपी पुरवणाऱ्या पालकाला पोलिसांचा चोप, व्हिडिओ व्हायरल

जळगाव दि ४(प्रतिनिधी)- जळगाव जिल्ह्यात एका शाळेत विद्यार्थ्याला कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पालकाला पकडून पोलिसांनी बेदम चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

चोपडा तालुक्यातील अडावद गावातील नूतन ज्ञानमंदिर विद्यालय या शाळेच्या आवारातील हा व्हिडीओ आहे. नूतन ज्ञानमंदिर शाळेच्या ठिकाणी दहावीचे परीक्षा केंद्र आहे. विद्यालयापासून १०० मीटरपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र करण्यात आले आहे. पहिल्याच मराठी विषयाच्या पेपरला आपल्या मुलाला एक पालक कॉपी पुरवण्याचा प्रयत्न करत होता.बंदोबस्तावरअसलेल्या पोलिसांना याबाबत समजताच त्यांनी संबंधिताला हटकले. मात्र, त्यानंतरही पालक कॉपी पुरवण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रात घुसला. त्यामुळे याठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने संबंधित पालकाला पकडून पोलीस काठीने चांगलाच चोप दिला. चोप देतांना संबंधित पालक जमिनीवर कोसळला. त्याठिकाणी एका बाजूला असलेल्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे मुलाला कॉपी पुरवायला जाणे एका पालकला चांगलेच महागात पडले आहे.

 

या व्हिडीओने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिसांकडून मारहाणीच्या या प्रकारावर पोलीस अधीक्षकांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मारहाण करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नसल्याची माहिती पोलीसी सूत्रांकडून मिळाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!