Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात ‘या’ काळात इतक्या दिवस असणार ‘ड्राय डे’

जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश, दिला कारवाईचा इशारा

पुणे दि २९ (प्रतिनिधी)-तळीरामांसाठी एक मोठी बातमी समोर येतेय. पुण्यात गणेशोत्सव काळात ३१ ऑगस्टपासून ९ सप्टेंबरपर्यंत दारू विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश काढले आहेत. त्यामुळे तळीरामांचा मोठा हिरमोड झाला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

गणेश उत्सव काळात दारू विक्री करता येणार नाही. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणावर दारु विक्री होत असते. त्यामुळे या उत्सवाला गालबोट लागण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात दारु विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिले आहेत. पण काहींनी हा निर्णय पूर्ण दहा दिवसांसाठी नाही तर फक्त ३१ आॅगस्ट आणि ९ सप्टेंबर या दिवसापुरता घेण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. यंदा पुणेकर दोन वर्षांनी गणेशोत्सव साजरा करणार आहे. त्यासाठी शहरात जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरात शांतता रहावी यासाठी हे आदेश काढण्यात आले आहे.

पोलिसही उत्सवासाठी सज्ज झाले आहेत. शहरात ३६०० सार्वजनिक गणेश मंडळ आहेत. या मंडळांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर देखील या गणपती मंडळांच्या गर्दीच्या ठिकाणी असणार आहे. शहरात ७५०० पोलीस तैनात ठेवण्यात येणार आहेत

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!