Just another WordPress site

उद्धव ठाकरेंपुढे एकनाथ शिंदे यांची माघार?

वाद टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, लवकरच करणार घोषणा

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी अद्याप मिळाली नसल्याने शिंदे गट ठाकरेंकडून दसरा मेळावा हायजॅक करणार अशी चर्चा रंगली होती. पण अखेर शिंदे गटाने माघार घेतली असून शिंदे गटाचा दसरा मेळावा शिवतिर्था एैवजी दुस-या ठिकाणी घेण्याचा विचार सुरु केला आहे. त्यामुळे शिवतीर्थावर ठाकरेंचाच मेळावा होणार आहे.

GIF Advt

शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे राज्यात सत्तांतर झालं आणि ठाकरे आणि शिंदे गट अशी शिवसेनेची विभागणी झाली. शिंदे गटाने शिवसेना पक्षासह चिन्हावर देखील आपलाच अधिकार असल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर शिवसेनेची ओळख असणारा शिवाजी पार्कवर होणारा पारंपरिक दसरा मेळावायंदा कोण घेणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दसरा मेळावा घेणार आहेत. मात्र, हा मेळावा शिवतीर्था ऐवजी दुसऱ्या ठिकाणी घेण्याचा शिंदे गटाचा विचार आहे. न्यायालयीन लढाई सुरू असल्यामुळे उद्धव ठाकरेंशी होणारा थेट संघर्ष टाळत शिंदे गट दुसरीकडे दसरा मेळावा घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. शिंदे हे लवकरच सर्व आमदारांची बैठक घेऊन दसरा मेळाव्याबाबत चर्चा करणार आहेत.त्यानंतर अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

शिवसेनेने २२ तारखेला दसरा मेळावा परवानगीचा अर्ज करूनही महापालिकेने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याने उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यात शिंदे गटातील काही नेत्यांनी दसरा मेळावा आम्ही घेणार असा दावा केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. पण आता त्यावर लवकरच पडदा पडण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!