आगामी निवडणूकीत मोठे फेरबदल घडणार, धक्कादायक सर्व्हे
ओपिनियन पोलमध्ये धक्कादायक आकडेवारी समोर, भाजपाची चिंता वाढणार की इंडियाची पहा अंदाज?
दिल्ली दि २६(प्रतिनिधी)- देशाची लोकसभा निवडणुक काही महिन्यांवर आली आहे. पण त्याआधी राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेशची निवडणुक होणार आहे. सध्या मध्यप्रदेशमध्ये भाजपाची सत्ता आहे. तर राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. यावेळी कोण बाजी मारेल याचा पोल घेतला असता मतदारांनी समिश्र काैल दिला आहे. यात सत्ता परिवर्तन होणार नसल्याचा अंदाज आहे.
एका कंपनीने घेतलेल्या पोलनुसार मध्यप्रदेशमध्ये भाजपाची सत्ता येण्याची शक्यता आहे. २०२३ च्या सर्वेनुसार भाजपाचे ११६ ते १२४ आमदार निवडून येण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १०० ते १०८ जागा मिळू शकतात. मध्य प्रदेशात २०१८ साली काँग्रेसचे ११४ आणि भाजपाचे १०९ आमदार निवडून आले होते. तर सर्वेनुसार काँग्रेस राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये आपले सरकार राखेल असा अंदाज आहे. सर्व्हेनुसार राजस्थानमध्ये काँग्रेस पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे. काँग्रेसला ९७ ते १०५ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपा ८० ते ९० जागा जिंकण्याची शक्यता आहे. दुसरीकडे छत्तीसगमध्ये सर्वेनुसार काँग्रेसला ६२ जागा मिळू शकतात. भाजपाच्या १२ जागा वाढून २७ आमदार निवडून येण्याची शक्यता आहे. आयएनएस कंपनीच्या ‘पोलस्ट्रॅट’ने १ सप्टेंबर ते १३ सप्टेंबर या कालावधीत हा सर्वे केला होता.
दुसरीकडे सी व्होटरने घेतलेल्या लोकसभा निवडणुक सर्व्हेत भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमताच्या २७२ आकड्यापेक्षा पंधरा अधिक, म्हणजेच २८७ जागा मिळतील तर त्यांच्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ला लोकसभेतील ३०६ जागा जिंकता येतील. मतांच्या टक्केवारीचा अंदाज काढला तर भाजपा आघाडीच्या पदरात ४२.६ टक्के मते पडतील असा अंदाज या सर्व्हेचा असून इंडिया आघाडीची मते ४१.६ टक्के असेल असा अंदाज आहे.