Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटातील हे पंधरा आमदार लवकरच ठाकरे गटात जाणार

एकनाथ शिंदेच्या गटातील आमदारांची अस्वस्थता वाढली, कमळ चिन्हावर निवडणुक लढण्याची होतेय चाचपणी

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- अजित पवार गट सत्तेत सामील होत महत्वाची खाती मिळवण्यात यशस्वी झाला आहे. पण वर्षाचा कालावधी लोटूनही शिंदे गटातील आमदार मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळं शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. पण आता एकनाथ शिंदे यांची चिंता वाढवणारा दावा करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मोठा दावा केला आहे. ते म्हणाले की, “सरकारमध्ये गेलेले कधीही नाराज राहणार नाहीत, असं होणार नाही. ते नाराज राहणारच. कारण कुणाला किती काहीही दिलं तरी ते कमीच वाटतं. शिंदे गटाच पंधरा आमदार नाराज आहेत. येत्या काळात हे आमदार उध्दव ठाकरेंकडे जाण्यासाठी उत्सुक आहेत. त्यासंदर्भात चर्चाही सुरू आहे. पण त्यांना उध्दव ठाकरे घेतील का हा प्रश्न आहे, असा दावा पवार यांनी केला आहे. दरम्यान संजय राऊत यांनीही शिंदे गटातील १७ ते १८ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे शिंदे गटात मोठी अस्वस्थता असल्याचा दावा केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आले आहे. त्यामुळे किमान आपली आमदारकी तरी वाचवावी असा विचार शिंदे गटातील आमदार करत असल्याची दबकी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. पण हे नाराज आमदार उध्दव ठाकरेंकडे जाणार का? हेच पाहणे महत्वाचे आहे.

दुसरीकडे शिंदे गटाला आपल्या हातून शिवसेना पक्ष जाण्याची भीती सतावत आहे. त्यामुळेच भविष्यात काही तांत्रिक अडचण आलीच आणि आमचे नेते, मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर आम्हाला मान्य असेल, असं शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!