नुकत्याच आई झालेल्या अभिनेत्रीच्या मुलीच्या हृदयात दोन छिद्र
इन्स्टाग्रामवर लाईव्हवर संवाद साधताना अभिनेत्रीला कोसळले रडू, म्हणाली कोणत्याही आईच्या बाबतीत...
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- बॉलीवूड अभिनेत्री आणि नुकतीच आई झालेली बिपाशा बासूने नुकताच एक मोठा खुलासा केला आहे. बिपाशाने अभिनेता करण सिंग ग्रोव्हर बरोबर २०१६ साली लग्न झाले होते. लग्नाच्या ७ वर्षानंतर त्यांना देवी नावाची मुलगी झाली. पण तिच्या जन्माच्या वेळी ओढावलेल्या प्रसंगावर तिने भाष्य केले आहे.
बिपाशाने अभिनेत्री नेहा धुपियासोबत इंस्टाग्रामवर लाईव्ह केले होते. यावेळी तिने आपल्या आयुष्यात आलेल्या घडामोडीवर भाष्य केले आहे. ती म्हणाली, “आमचा पालक होण्याचा प्रवास बाकीच्यांपेक्षा थोडा वेगळा आहे. तो प्रवास आमच्यासाठी सर्वात कठीण होता. इतकं अवघड की आज किती दिवसांनी माझ्या चेहऱ्यावर हसू आलं. कोणत्याही आईला असा त्रास होऊ नये असे मला वाटते., कारण नवीन नवीन आई झाल्यानंतर, जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल असे काही कळते, ज्यामुळे तुमचे हृदय तुटू शकते, मला माझ्या मुलीच्या जन्माच्या तिसऱ्या दिवशी कळले की तिच्या हृदयात २ छिद्र आहेत.तिच्यासाठी आणि करणसाठी हा मोठा धक्का होता. त्यावेळी याबाबत आम्ही आमच्या कुटुंबीयांनाही सांगितले नव्हते. आम्हाला नेमके समजत नव्हते की व्हीएसडी नेमके काय आहे. हा वेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट आहे. तो काळ आमच्यासाठी फार वाईट होता. आम्ही त्याबाबत आमच्या कुटुंबाशी चर्चा केली नाही.आम्ही दोघेही हादरलो होतो. काय करावे काय करु नये काही कळत नव्हते. आम्हाला तिच्या आगमनाचा जल्लोश करायचा होता पण आम्ही सुन्न झालो होतो. पहिले पाच महिने आमच्यासाठी खूप कठीण होते. छिद्र मोठे असल्याने शस्त्रक्रिया आवश्यक असून ही वेळ शस्त्रक्रियेसाठी योग्य असल्याचे सांगण्यात आले. असे तेव्हा होते जेव्हा बाळ तीन महिन्यांचे आहे. तुम्ही बाळावर ओपन हार्ट सर्जरी कशी करू शकता? हा विचार करूनही वेदना होतात असहाय्य वाटू लागते. मन घट्ट करुन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.मात्र करण त्यासाठी तयार नव्हता. द्विधा मनस्थिती होती अखेर करणने ते मान्य केले आणि देवीची शस्त्रक्रिया ६ तास चालली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असे बिपाशाने भावूक होत सांगितले. दरम्यान अभिनेत्री बिपाशा बासू आणि अभिनेता करण सिंग ग्रोव्हर यांनी १२ नोव्हेंबर २०२२ मध्ये मुलीचं जगात स्वागत केलं. बिपाशा आणि करण यांनी त्यांच्या लेकीचं नाव देवी बासू ग्रोव्हर असं ठेवलं आहे.
बाॅलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. सध्या ती तिची फॅमिली लाईफ एन्जॉय करत आहे. पण परंतु सोशल मीडियावर अभिनेत्री बिपाशा बासू खूपच सक्रिय असते. बिपाशा बासू अभिनेत्री असण्यासोबतच एक डिझाईनरही आहे. बिपाशाचा शूज, कपडे आणि होम डेकोरेशनचा बिझनेस आहे.