महाराष्ट्रातील हे आमदार आहेत सर्वाधिक श्रीमंत आमदार
महाराष्ट्रातील आमदार कोट्याधीश, आमदार श्रीमंतीत दुसऱ्या स्थानी, पहा कोणाकडे किती संपत्ती
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्रासह देशातील आमदार आणि खासदारांच्या संपत्तीवरून अनेकदा वाद होत असतात. त्यामुळे अनेकदा चर्चा देखील होत असतात. पण आता एडीआर संस्थेने सर्वच राज्यातल्या आमदारांच्या संपत्तीचा अभ्यास करत एक यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील आमदारांनी बाजी मारली आहे. राज्यातील आमदारांकडे कोट्यावधींची संपत्ती आहे.
श्रीमंत आमदारांच्या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, या यादीत पहिला क्रमांक कर्नाटकचे आमदार आहेत. कर्नाटकच्या २२३ आमदारांकडे १४ हजार ३५९ कोटींची संपत्ती आहे. तर महाराष्ट्राच्या २८४ आमदारांकडे ६ हजार ६७९ कोटी इतकी संपत्ती आहे. विशेष म्हणजे मध्यंतरी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्शन वॉच या संस्थांनी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये देशातील सर्वात श्रीमंत आणि गरीब आमदारांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे देशातील सर्वात श्रीमंत आमदार ठरले होते. एडीआरच्या अहवालात पक्षानुसार संपत्तीचीही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. यानुसार, भाजपच्या १,३५६ आमदारांकडे १६ हजार २३४ कोटींची संपत्ती आहे. कॉँग्रेसच्या ७१९ आमदारांकडे १५ हजार ७९८ कोटींची संपत्ती आहे. पक्षनिहाय टॉप-१० पक्षांच्या यादीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचाही समावेश आहे. राष्ट्रवादीच्या ६३ आमदारांकडे ९१२ कोटी असून यादीत नवव्या क्रमांकावर हा पक्ष आहे. इतर राज्यातील आमदारांची संपत्ती पाहिल्यास आंध्र प्रदेशातील १७४ आमदारांकडे ४ हजार ९१४ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर
उत्तर प्रदेशातील ४०३ आमदारांकडे ३ हजार २५५ कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर गुजराथमधील १८२ आमदारांकडे २ हजार ९८७ कोटी रुपयांची संपती आहे. राज्यात श्रीमंत आमदारात सर्वाधिक भाजपाचे आमदार आहेत.
महाराष्ट्रातील श्रीमंत आमदार
१)पराग शहा, ५०० कोटी
२)मंगलप्रताप लोढा, ४४१ कोटी
३)संजय जगताप, २४९ कोटी
४)विश्वजित कदम, २१६ कोटी
५)अबु आझमी, २०९ कोटी
६)तानाजी सावंत, २०६ कोटी
७)राजेश पवार, १९१ कोटी
८)प्रशांत ठाकूर, १८३ कोटी
९) समीर मेघे, १५९ कोटी
१०) रत्नाकर गुट्टे, १४८ कोटी