Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात महिलेकडून शेजारच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

महिलेच्या पतीचे कोरोनात निधन, महिलेचा अल्पवयीन तरुणावर जबरदस्तीने बलात्कार, शहरात खळबळ

पुणे दि २१(प्रतिनिधी)- पुण्यातील कोंढव्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीचे कोरोनामध्ये निधन झाल्यानंतर महिलेने अल्पवयीन तरुणासोबत जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. कोंढवा पोलिसांनी याप्रकरणी महिलेविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित अल्पवयीन तरुण आणि आरोपी महिला कोंढवा परिसरात राहतात. दोघेही एकमेकांचे शेजारी आहेत. कोरोना काळात या महिलेच्या पतीचे निधन झाले होते. त्यानंतर ही महिला एकटीच होती. त्याच दरम्यान या महिलेने जबरदस्ती केल्याची तक्रार पोलिसांत देईल अशी धमकी अल्पवयीन मुलाला दिली होती. त्यानंतर तिने मुलासोबत जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले. या संपूर्ण कृत्याचा तिने मोबाईलमध्ये व्हिडिओ क्लिप देखील या तरुणाला काढण्यासाठी भाग पाडले. हा प्रकार मे २०२१ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत घडला आहे. दरम्यान महिलेच्या मोबाईलमध्ये या सगळ्या प्रकाराची अश्लील क्लिप असल्याचे पीडित तरुणाच्या कुटुंबीयांना समजले, त्यानंतर त्यांनी पोलीसांकडे धाव घेत महिलेविरोधात तक्रार दाखल केली. २८ वर्षीय महिलेच्या मोबाईलमध्ये दोघांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ क्लिप सापडल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

पोलीसांनी १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाच्या तक्रारीनंतर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे. सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुण्यात गुन्हेगारी मोठया प्रमाणात वाढली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!