Latest Marathi News
Ganesh J GIF

राजकीय भुकंप! काँग्रेसचे ‘हे’ दहा आमदार लवकरच पक्ष सोडणार?

या आमदाराच्या फार्महाऊसवर नाराज आमदारांची गुप्त बैठक, यामुळे पक्षात बंडाचे वारे

हैद्राबाद – महाराष्ट्रासह देशतील राजकारणात सध्या मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण लवकरच तेलंगाणातील सत्ताधारी काँग्रेस पक्षातील दहा आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री रेवंती रेड्डीसह कॉंग्रेसच्या नेतृत्वात चिंता निर्माण झाली आहे.

काँग्रेसची स्वबळावर सत्ता असलेल्या तेलंगाणामध्ये पक्षात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लक्षात घेता भाजपाने आॅपरेशन लोटस सुरु केले आहे. त्यामुळे राजकीय संघर्ष पहायला मिळत आहे. पक्षातील काही आमदार हे मंत्री पोंगुलेटी श्रीनिवास रेड्डी यांच्याबाबत नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आमदारांमध्ये वाढत असलेला असंतोष शमवण्यासाठी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे सरकारमधील सर्व मंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. तेलंगाणामधील काँग्रेसच्या १० आमदारांनी आमदार अनिरुद्ध रेड्डी यांच्या फार्महाऊसमध्ये गुप्त बैठक घेतली. या बैठकीला नैनी राजेंदर रेड्डी, भूपती रेड्डी, येनम श्रीनिवास रेड्डी, मुरली नाईक, कुचुकुल्ला राजेश रेड्डी, संजीव रेड्डी, अनिरुद्ध रेड्डी, लक्ष्मीकांत, दोंती माधव रेड्डी आणि बीरला इलैय्या हे आमदार सहभागी झाले होते. काँग्रेसच्या १० आमदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, तर तेलंगणातील सरकार अल्पमतात येणार आहे. त्यामुळे राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अधिकाऱ्यांना येण्यास मनाई करण्यात आली आहे. दरम्यान नागरकर्नूलचे खासदार मल्लू रवी यांनी सांगितले की, ही केवळ डिनर मिटिंग होती. विरोधी पक्षांनी विनाकारण हे प्रकरण वाढवण्याचा प्रयत्न केला, असा दावा केला आहे.

तेलंगणातील ११९ सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे ६४ आमदार आहेत. काँग्रेसकडे बहुमतापेक्षा केवळ ४ आमदार जास्त आहेत. याशिवाय तेलंगणात बीआरएसचे ३९ आणि भाजपाचे ८ आमदार आहेत. तर एआयएमआयएमचे ७ आमदार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!