या अभिनेत्रीने मुंबईत खरेदी केले तब्बल १९० कोटीचे घर?
शेजारी होते फारच खास, बंगल्याचे नावही खास, पण अभिनेत्रीच्या आईचा मोठा खुलासा
मुंबई दि २(प्रतिनिधी)- बाॅलीवूड अभिनेत्री आणि उर्वशी रौतेला चित्रपटापेक्षा जास्त तिच्या लक्झरी लाइफमुळे जास्त चर्चेत असते. यासोबतच सोशल मीडिया वर टाकलेल्या व्हिडीओ, पोस्टमुळे देखील ती चर्चेत असते. आता ती एका नवीन कारणामुळे चर्चेत आहे. मुंबईत तिने मोठे घर घेतले आहे.
अलीकडेच उर्वशीने १९० कोटी रुपयांचा बंगला खरेदी केला आहे आणि त्यात ती शिफ्टही झाली आहे. अशा बातम्या सगळीकडे आल्या होत्या. उर्वशीच्या मालकीचा हा बंगला ४ मजल्यांचा आहे. उर्वशी आता याच बंगल्यात राहणार आहे. उर्वशी रौतेलाचं हे नवीन आलीशान घर मुंबईमधील जुहूमधील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये आहे. या बंगल्याचं नाव सेलिस्ट असं आहे. उर्वशीच घर हे प्रसिद्ध दिवंगत चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या घराच्या शेजारीच आहे. घराचं इंटिरियर घराप्रमाणेच आकर्षक आणि आलिशान आहे. घरात एक पर्सनल जीमही आहे. मागील अनेक महिन्यांपासून उर्वशी मुंबईमध्ये घर शोधत होती. अखेर तिचा हा शोध संपला आहे. पण उर्वशीच्या आईने या बातम्या खोट्या असल्याचे सांगितले आहे. मीरा रौतेला यांनी त्यांच्या पोस्टला कॅप्शन देत लिहिले – इंशाअल्लाह लवकरच असा दिवस येऊ देत.. आणि सर्व #न्यूज #चॅनेलच्या प्रार्थना स्वीकारल्या जाऊ देत.. आमीन अशी पोस्ट केली आहे. दरम्यान कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील तिच्या लूकमुळे उर्वशी चर्चेत आली होती. तिने कान्समधील उर्वशीचे अनेक फोटो तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले होते. कान्समध्ये उर्वशी केवळ तिच्या लूकमुळेच नव्हे तर तिने परिधान केलेल्या मगरीच्या नेकलेसची ही चर्चा होती.
उर्वशीचे ऋषभ पंतसोबत नाव अनेकदा जोडले गेले आहे. मात्र याकडे दोघांनी नेहमीच दुर्लक्ष केले. एका मुलाखतीत तिने मिस्टर आरपी असा उल्लेख केला होता. त्यानंतर या दोघांच्या नात्याची चर्चा सुरु झाली. ऋषभ पंतला मिस्टर आरपी असे ही म्हणतात. सध्या तिचा इंस्पेक्टर अविनाश ही ऑनलाईन वेबसीरीज चर्चेत आहे.