या अभिनेत्रीने महाराष्ट्रात खरेदी केली कोट्यावधींची जमीन
या ठिकाणी केली इतक्या एकर जमिनीची खरेदी, एवढ्या कोटीला झाली जमीन खरेदी, कुठे आहे जमीन?
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा हा शेतीचा आहे. अनेकजण देशात शेती करत असतात. पण आता बाॅलिवूडचा सुपरस्टार किंग खान अर्थातच शाहरुख खान याची लेक सुहाना खान देखील शेती करणार आहे. तिने महाराष्ट्रात शेती खरेदी केली आहे. तिने तब्बल कोट्यावधींची जमीन खरेदी केली आहे.
सुहाना खान लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. लवकरच सुहाना झोया अख्तरच्या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचे नाव द आर्चिज असून सुहाना या चित्रपटात दिसणार आहे. सुहानाला अभिनयासोबतच शेती करण्याचीही आवड आहे. यासाठी सुहानाने अलिबाग मधील थाल या गावातील जमीन तिने खरेदी केली आहे. सुहानाने खास शेती करण्यासाठी ही जमीन विकत घेतली आहे. आहे.जमिनीची किंमत १२ कोटी ९१ लाख रुपये आहे. या जमिनीवर २२१८ चौरस फूट बांधकाम करण्यात आले आहे. सुहानाने ही जमीन अंजली, रेखा आणि प्रिया नावाच्या तीन बहिणींकडून विकत घेतली आहे. अलिबागच्या थल गावात शाहरुख खानच्या सी फेसिंग मालमत्तेजवळ सुहाना खानची नवीन शेतजमीन आहे. सुपरस्टारच्या फार्महाऊसमध्ये एक आलिशान स्विमिंग पूल, हेलिपॅड आणि सर्व अत्यावश्यक आधुनिक सुविधांचा समावेश आहे. मालमत्तेच्या नोंदणी दस्तऐवजांमध्ये सुहाना खानचे वर्णन ‘कृषीतज्ञ’ असा करण्यात आले आहे. अर्थात याबाबतची अधिकृत घोषणा झालेली नाही.
सोशल मीडियावर द आर्चीजचा टीझर व्हायरल होत आहे. सुहाना खान सोबत, बहुप्रतिक्षित प्रोजेक्टमध्ये श्रीदेवीची दुसरी मुलगी खुशी कपूर, अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा, डॉट, मिहिर आहुजा, वेदांग रैना आणि युवराज मेंडा यांच्या प्रमुख भूमिकांसह एक उत्कृष्ट स्टार कास्ट आहे. तो लवकरच प्रदर्शित होणार आहे.