Latest Marathi News
Ganesh J GIF

या अभिनेत्रीचा या पक्षाच्या खासदारासोबत पार पडला साखरपुडा

अभिनेत्रीने फोटो शेअर करत दिली माहिती, म्हणाली मी प्रार्थना केली आणि अखेर...

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये सध्या लग्नाचा माैसम दिसत आहे. अनेक सिन तारे लग्न करताना दिसत आहेत. यात लवकरच एका जोडीची भर पडणार आहे. पण या जोडीला राजकारणाची किनार आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा धुमधडाक्यात संपन्न झाला आहे.


गेल्या काही दिवसांपासून राघव आणि परिणीती यांच्या साखरपुड्याच्या तुफान चर्चा मीडियामध्ये आणि तिच्या फॅन्समध्ये गाजत होत्या. अखेर ज्या दिवसाची अनेक दिवसांपासून सगळे वाट बघत होते, तो दिवस आला आणि अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा संपन्न झाला. परिणितीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याच्या साखरपुडयाचे फोटो शेअर करत सर्वांना माहिती दिली आहे. कुटुंब आणि जवळच्या फक्त १५० लोकांच्या उपस्थितीत आज त्यांचा साखरपुडा जल्लोषात संपन्न झाला आहे. या सोहळ्याला प्रियांका चोप्रा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रासह अनेक दिग्गज हजर होते. या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना परिणितीने कॅप्शनमध्ये लिहिले, “मी प्रार्थना केली. अखेर मी हो म्हणाली”. त्याबरोबरच अंगठीचा इमोजीही शेअर केला आहे. यात परीणीती आणि राघव अतिशय रोमॅंटिक मूडमध्ये दिसत आहे. यात त्यांनी त्यांच्या अंगठीचा फोटो देखील शेअर केला आहे. दरम्यान या साखरपुड्यासाठी अभिनेत्री परिणिती चोप्राने आणि राघव चड्ढाने खास लूक केला होता. परिणिती आणि राघवने पांढऱ्या रंगाचा ड्रेस तर राघव यांनी पांढऱ्या रंगाचा सूट परिधान केला होता.

View this post on Instagram

A post shared by @parineetichopra

परिणीती आणि राघव यांनी आज साखरपुडा केला असला तरी याआधी त्यांनी कधीही सर्वांसमोर नात्याचा स्वीकार केला नव्हता. अभिनेत्री परिणीती चोप्राची एकूण संपत्ती ६० कोटींच्या आसपास आहे. परिणीती सिनेमे आणि जाहिरातींच्या माध्यमातून जास्तीत जास्त कमाई करते. तर राघव चढ्ढा हे राजकारणी असण्यासोबत एक चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत. त्यांनी डेलॉइट, श्याम मालपाणी आणि ग्रँट थॉर्नटन यांसारख्या अकाउंटन्सी फर्ममध्ये काम केलं आहे. तर ते सर्वात तरुण राज्यसभा खासदार देखील आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!