Just another WordPress site

एकमेकींच्या झिंज्या ओढत मुलींची रस्त्यात हाणामारी

घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, पोलीसांनी येत केले असे की भांडणे...

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- सोशल मीडियावर सतत नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपले डोके चक्रावून टाकत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये काही मुली भर रस्त्याच्या फ्री स्टाईल हाणामारी करताना दिसत आहेत. या व्हिडीओची तुफान चर्चा होत आहे.

सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत मुली केस आणि कपडे ओढत हाणामारी करत आहेत. या मुली इतक्या रागात होत्या की त्या एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत होत्या. पण त्यांचे भांडण पाहुन काही जण ती भांडणे सोडवण्यासाठी गेले असता, त्यांची देखील धुलाई मुलींनी केली. त्यानंतर त्यांना भांडताना पाहून कोणी त्यांना सोडवायलाही जायची हिम्मत केली नाही. यानंतर एका पोलीसाने त्या ठिकाणी येत त्या मुलींवर स्प्रे मारला. त्यानंतर या पोरी भांडायच्या थांबतात आणि भररस्त्यात सुरु असलेली ही फ्री स्टाईल हाणामारी थांबते. हे पाहुन अनेक जण आश्चर्यचकित झाले.

GIF Advt

हा व्हिडिओ कुठला आहे आणि या मुली का भांडत होत्या, त्यांच्यात काय वाद होता याबाबत सध्या काहीही माहिती नाही. पण, सोशल मीडियावर लोक या व्हिडिओची खिल्ली उडवताना दिसत आहेत. तर काहींनी या पोलिसांचं कौतुक केलं आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!