Latest Marathi News

ही अभिनेत्री या बांधकाम व्यावसायिकासोबत रिलेशनमध्ये

त्यांचा तो व्हिडीओ होतोय व्हायरल, मिस्ट्री मॅन नक्की आहे तरी कोण?

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- अभिनेत्री भूमी पेडणेकर सतत कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत असते. आता ती तिच्या नवीन अफेअरमुळे बी-टाऊनमध्ये चर्चेत आली आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या रिसेप्शनमध्ये भूमी पेडणेकरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तेंव्हापासून तिच्या रिलेशनच्या चर्चा सुरू आहेत.


भुमी पेडणेकरचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या
व्हिडिओमध्ये अभिनेत्री एका मिस्ट्री मॅनला लिप किस करत होती. व्हिडिओ लीक झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. भूमी ज्याका किस करत होती, तो मिस्ट्री मॅन कोण होता हे आता समोर आले आहे. त्याचे नाव यश कटारिया असुन तो बांधकाम व्यावसायिक आहे. भूमी आणि यश अनेक दिवसापासून रिलेशनशीपमध्ये आहेत. मात्र, भूमी आणि यशकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. भुमी तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा ट्रोल झाली आहे.नुकतीच ती तिच्या ब्लॅक ड्रेसमुळे ट्रोल झाली होती.

भूमी पेडणेकर गोविंदा नाम मेरा मध्ये दिसली होती. जिथे त्याने कियारा अडवाणी आणि विकी कौशलसोबत काम केले. आता ती लवकरच मॉब, द लेडी किलर आणि अफवा से तक्षक या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीच्या पार्टीत भुमी स्टायलिश अंदाजात दिसून आली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!