टी-सीरिजच्या विवाहित मालकाला डेट करतेय ही अभिनेत्री?
सोशल मीडिया पोस्टमुळे एकच खळबळ, नेटक-यांचे भन्नाट रिप्लाय
मुंबई दि २२(प्रतिनिधी)- प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांना डेट करत आहे, असा मेसेज सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तरी भुषण कुमार यांचे अभिनेत्री दिव्या खोसला कुमार हिच्याशी लग्न झाले आहे. नोराने यापूर्वी टीसिरीजसाठी अनेक अल्बम शूट केले आहेत.एका ट्वीटर हँडलचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.
अभिनेत्री-डान्सर नोरा फतेही सध्या तिच्या रिलेशनमुळे चर्चेत आली आहे. एका ट्विटर युजरने ठामपणे असे म्हटले आहे की नोरा आणि भूषण कुमार डेट करत आहेत. तो आपल्या पोस्ट मध्ये म्हणतो की, ‘अधिकृतपणे समोर आलेली बातमी- नोरा फतेहीचे टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांच्यासोबत गेल्या २ वर्षांपासून अफेअर आहे आणि हे त्याच्या पत्नीला माहीत आहे. पण तिला या सगळ्यात काहीच अडचण नाही. पैसाच सर्वकाही आहे.’ पण त्याच्या या ट्विट नंतर अनेकांनी संताप व्यक्त करत त्या ट्विट करणाऱ्याला सुनावले आहे. तर एकाने ‘ हे वाचून भूषण कुमार तुझ्यावर केस करू शकतो. असे सुनावले आहे. एकंदरीत नोरा फतेही आणि भूषण कुमारच्या अफेअरचे हे ट्वीट सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल होत आहे. या अफवा असल्या तरी सुद्धा यावर नेटिझन्स जोरदार कमेंट्स करत आहे.
नोरा फतेहीने टी-सीरिजच्या विविध गाण्यांमध्ये डान्स परफॉर्मन्स केला आहे. तिचे अलीकडेच आलेले आयुष्मान खुरानासोबतचे ‘जेढा नशा’ हे गाणंही टी-सीरिजचेच आहे. याशिवाय नोराचे थँक गॉड सिनेमातील ‘मनिके मागे हिथे’ हे लोकप्रिय गाणेही टी सिरीजचे आहे. टी सिरिज संगीत क्षेत्रातील दिग्गज कंपनी म्हणून ओळखली जाते. अभिनेत्री दिव्या खोसला कुमार आणि भुषण कुमार या कंपनीचे कामकाज पाहत आहेत.