Latest Marathi News

ही अभिनेत्री महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाच्या प्रेमात

दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल, केमेस्ट्री चर्चेचा विषय

मुंबई दि ३१(प्रतिनिधी)- बॉलिवूड मध्ये रोज नवीन जोड्या तयार होताना दिसत असतात. एकमेकांच्या रिलेशनचे गाॅसीपही होत असतात. त्यामध्ये आता अभिनेत्री जान्हवी कपूरची चर्चा होत आहे. मागच्या काही काळापासून ती एक्स बॉयफ्रेंड बरोबर कुठे ना कुठे दिसत आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिचा बाॅयफ्रेंड एका राजकीय घरान्याशी संबंधित आहे.

जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया पुन्हा एकदा एकमेकांना डेट करत आहेत. जान्हवी कपूर आणि शिखर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काही महिन्यांपूर्वीच जान्हवी आणि शिखर यांनी पुन्हा एकमेकांशी बोलायला सुरुवात केली. त्यानंतर काही काळाने त्यांनी त्यांच्या नात्याला नव्याने आणखी एक संधी देण्याचा विचार केला आहे. अशी माहिती जवळच्या सुत्रांनी दिली आहे. शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पाहारिया यांचा मुलगा आहे. करण जोहरने त्याच्या ‘कॉफी विथ करण ७’ या शोमध्ये दोघांमधील नात्याची पुष्टी केली होती. याआधीही जान्हवी कपूर आणि शिखर मुंबईत बऱ्याचदा एकत्र दिसले आहेत.

२९ डिसेंबरला अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्याची पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीमध्ये जान्हवी कपूरही उपस्थित होती. यावेळचा तिचा आणि शिखर पाहारियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  याआधी श्रीदेवीच्या ‘नो डेटींग क्लॉज’मुळे जान्हवी तिच्या अभिनय कारकीर्दीवर लक्ष केंद्रित करू शकली म्हणून या दोघांना तेव्हा वेगळं व्हावं लागलं.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!