Latest Marathi News

आणि त्या प्रेक्षकाला पाहताच गाैतमीने केले असे काही की…

गाैतमीने तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल, बघा नेमक काय घडल

सांगली दि ३१(प्रतिनिधी)- गौतमी पाटीलची वेगळी ओळख करुन देण्याची आता गरज नाही. कारण आपल्या दिलखेचक अदांनी गौतमीने तरुणांना वेड लावले आहे. पण लावणी करत असताना कुणी छेड काढल्यास त्याला ती उत्तरही देत असते. अशाच एका प्रेक्षकाने छेड काढल्यानं गौतमीनं त्याला चांगलाच चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील बेडग गावामध्ये गौतमी पाटीलचा लावणीचा कार्यक्रम पार पडला. गौतमीचा कार्यक्रमांना तोबा गर्दी असते. बेडगमध्येही तिच्या कार्यक्रमाला तोबा गर्दी झाली होती. त्यावेळी गौतमी एका लावणीच्या कार्यक्रमात आली असता तिच्या भोवती जमलेल्या गर्दीतील काही तरुणांनी तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी गौतमी चांगलीच संतापली. तिने हातात चप्पल घेत तरुणाला चोपून, तुडवून काढत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. काही जण हा व्हिडिओ दोन तीन महिने जुना असल्याचे सांगत आहेत. पण यात गाैतमी चांगलीच चिडलेली दिसत आहे.

लावणीच्या तालावर प्रेक्षकांनाही ठेका धरायला लावणारी प्रसिद्ध नर्तिका गौतमी पाटील रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. तिचं नृत्य पाहिल्यानंतर सोशल मीडियावर गौतमीला बरंच ट्रोल करण्यात आलं. अश्लीलतेचे प्रदर्शन करत असल्याच्या वादावरुन गौतमीच्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात यावी अशी चर्चा होते. पण गाैतमीची क्रेझ सध्या जोरावर आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!