Latest Marathi News

ही अभिनेत्रीचा मालदीवमध्ये होणार साखरपुडा?

दोघांच्या डेटच्या चर्चा जोरात, अभिनेत्री म्हणाली "या गोष्टी दिर्घकाळ.....

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- बाॅलीवुड स्टार्स आपल्या व्यक्तीगत आयुष्यामुळे कायम चर्चेत असतात. त्याचबरोबर त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा देखील कायम होताना दिसत असतात. आता बी टाउनमध्ये अभिनेत्री क्रिती सेनॉन अभिनेता प्रभासला डेट करत असल्याच्या चर्चांना उधान आले आहे.

चित्रपट समीक्षक म्हणून ओळखणाऱ्या उमेर संधूने ट्विट केले होते की कीर्ती सेनन आणि प्रभास पुढील आठवड्यात मालदीवमध्ये एंगेजमेंट करणार आहेत. त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बाब आहे. त्याच्या या ट्विटनंतर जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या पण आता यावर क्रितीने खुलासा केला आहे. ती म्हणाली “अशाप्रकारच्या चर्चांवर प्रतिक्रिया देणं मी नेहमीच टाळते. कारण जेव्हा आपण यावर काही बोलतो तेव्हा अशा चर्चांना आणखी प्रोत्साहन मिळतं. पण जेव्हा मला वाटतं की या सगळ्याचा परिणाम माझ्या कुटुंबियांवर होत आहे किंवा एखादी गोष्ट आता मर्यादेपलिकडे जात आहे आणि माझ्या सन्मान, प्रतिमेला धक्का बसत आहे. तेव्हाच मी या सगळ्या गोष्टींवर प्रतिक्रिया देते. जनता या गोष्टी दिर्घकाळ लक्षात ठेवत नाही. हे सगळं आता चर्चेत आहे पण कालांतराने या सगळ्या चर्चा संपून जातील.” असे स्पष्टीकरण देत या चर्चा अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान जेव्हापासून ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर लाँच झाला, त्यादरम्यान त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.


क्रिती सेनॉन सध्या कार्तिक आर्यनबरोबरच्या ‘शहजादा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.साऊथ सुपरस्टार प्रभास आणि बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन लवकरच त्यांच्या आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!