काय सांगता!लग्नाआधीच आई होणार ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री
खास पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज, चाहते आवक, नेटक-यांकडून वडिलांची विचारणा
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- बाॅलिवूड मधील अभिनेत्री इलियाना डिस्क्रूज ही गेल्या काही काळापासून रुपेरी पड्यापासून दूर राहत आहे. अशातच ती तिच्या खसागी आणि सोशल मीडियातील पोस्टमुळे मात्र नेहमीच चर्चेत असते. पण आता ती पुन्हा चर्चेत आली आहे. कारण तिने आपण आई होणार असल्याचे गुड न्यूज सोशल मीडियावर शेअर केली आहे.
इलियानाने सोशल मीडियामार्फत तिच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज शेअर केली आहे. या न्यूजमध्ये ती आई होणार असल्याची पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच, काही क्षणातच चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. . इलियानाने सोशल मीडियावर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत बाळाचे कपडे दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये ‘ममा’ असं लिहिलेली एक चेन दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “कमिंग सून. तुला भेटण्याची मी आणखीन वाट पाहू शकत नाही माय लिटिल डार्लिंग.” पण ही पोस्ट शेअर करताना इलियानाने तिच्या बाळाच्या वडिलांची ओळख गुप्त ठेवली आहे. अभिनेत्रीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ही गुडन्यूज देताच अभिनेत्रीला चाहते बाळाचं नाव विचारत आहेत. काही दिवसांपासून इलियाना ऑस्ट्रेलियन फोटोग्राफर एंड्रयू नीबोनला डेट करत होती. मात्र त्यांचं हे नात फार काळ टिकू शकलं नाही. या दोघांच्या ब्रेकअपनंतर तिच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. यानंतर तिचं नावं कतरिना कैफचा भाऊ सेबॅस्टियनसोबत जोडलं जात आहेत.पण इलियानाने आतापर्यंत त्याच्याशी लग्न केलेलं नाही. त्यानंतर आता इलियानाने गरोदरपणाची घोषणा करतातच तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
मैं तेरा हीरो, रुस्तम, बर्फी, फाटा पोस्टर निखला हीरो, बादशाहो, पागलपंती आणि रेड यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये इलियाना डिक्रूज झळकली आहे. बॉलिवूडसोबतच इलियानेने साऊथ इंडस्ट्रीतही स्व:तचं वेगळं स्थान मिळवले आहे.