बाॅलीवूडची ही अभिनेत्री या महिन्यात घेणार सात फेरे
गुपचुप उरकला साखरपुडा, सोशल मीडियावर चर्चांना उधाण, चाहत्यांमध्ये उत्साह
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- बाॅलिवूडची सुंदर अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चढ्ढा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. परिणीतीच्या हातात अंगठी दिसल्याने त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चांनाही उधाण आलं होतं. आता परिणीती व राघव यांच्या लग्नाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
परिणीती व राघव चड्ढा चार महिन्यांत म्हणजेच २०२३च्या ऑक्टोबर मध्ये लग्नगाठ बांधणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राघव-परिणितीचा रोका गुपचूप पार पडला, ज्यात फक्त कुटुंबातील सदस्यांचा सहभाग होता. तर दुसरीकडे परिणीती चोप्रा तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती लग्नाच्या प्रश्नावर लाजताना दिसत असली तरी तिच्या चेहऱ्यावरचे हसू बरेच काही सांगून जात आहे. परिणीती चोप्राची बहीण व प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राही यादरम्यान भारतात येणार आहे. प्रियांका नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या ‘जिओ मामी फिल्म फेस्टिव्हल’साठी उपस्थित राहणार आहे. त्यामुळे याच दरम्यान परिणीती व राघव चड्ढा लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.सध्या परिणीती चोप्रा व राघव चढ्ढा दोघेही त्यांच्या कामात प्रचंड व्यग्र आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात ते लग्न करणार आहेत.
परिणीती नुकतीच अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांच्यासोबत ‘हाइट’ चित्रपटात दिसली होती. लवकरच ती इम्तियाज अली दिग्दर्शित चमकीला या चित्रपटात दिलजीत दोसांझसोबत दिसणार आहे. अमरसिंग चमकीला या पंजाबी गायकाला चित्रपटाचे प्रेरणास्थान मानले जाते.