Latest Marathi News
Ganesh J GIF

‘पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकाळात आम्हाला नाईलाजाने काम करावं लागलं’

अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट, उद्धव ठाकरेंबाबतही दावा, मुख्यमंत्रीपदाचा तो किस्सा

पुणे दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज राज्याच्या राजकारणात खूपच चर्चेत आहेत. राज्याचे राजकारणही त्यांच्या भोवती फिरत आहे. पण पुण्यात आयोजित एका मुलाखतीत अजित पवार यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. यावेळी अजित पवार यांनी चाैफेर फटकेबाजी केली आहे.

पुण्यात  ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीमध्ये अजित पवार यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी अजित पवार यांनी मोठे खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी ‘उद्धव ठाकरे यांच्या काळात आम्ही आनंदाने काम केलं, तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात आम्हाला नाईलाजाने काम करावं लागलं’ असा खुलासा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव होण्याची शक्यता आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे दोघांनाही आमदारकीचा अनुभव नव्हता. त्यांच्या काळात मी उपमुख्यमंत्री पदावर काम केलं. पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकाळात आम्ही चार वर्ष काम केलं. २०१९ मध्ये महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात आम्ही एकत्रित चांगलं काम केलं, असे सांगताना आपण राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे सांगत माझ्याबद्दल शंका-कुशंका मनातून काढा, त्यामुळे मी इकडे गेलो, तिकडे गेलो, असं करु नका. असे आवाहन केले आहे.

अजितदादांनी यावेळी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. २००४ च्या निवडणूकीत राष्ट्रवादीचे जास्त आमदार निवडणूक आले होते. आम्ही आर. आर. पाटील यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित केलं होतं पण दिल्लीत काय घडलं माहिती नाही आम्हाला उपमुख्यमंत्रीपद देण्यात आल्याचे अजित पवार म्हणाले.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!