Latest Marathi News
Ganesh J GIF

काँग्रेसच्या या आमदाराचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश

इंडिया आघाडीला मोठा धक्का, एकनाथ शिंदेंचा काँग्रेसला झटका, राजकीय समीकरणे बदलणार

जयपूर दि ९(प्रतिनिधी)- आगामी लोकसभा निवडणुक एनडीए विरूद्ध इंडिया अशी लढत होणार आहे. पण त्याआधी राजस्थान मध्ये निवडणुका पार पडणार आहे. पण त्याआधीच इंडिया आघाडीला धक्का बसला आहे. कारण राजस्थानमधील माजी मंत्री आणि लाल डायरीमुळे विशेष चर्चेत आलेले काँग्रेसचे आमदार राजेंद्र सिंह गुढा यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.

राजस्थानात सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. काँग्रेस पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर भाजपा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. गुढा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. शिंदेच्या हातात शिवसेनेची सूत्रे आल्यानंतर राज्याबाहेरील पहिलाच आमदार शिंदे गटाच्या गळाला लागला आहे. काही दिवसांपूर्वी गुढा यांनी विधानसभेत एक लाल डायरी दाखवत मोठा गाैप्यस्फोट केला होता. ते म्हणाले होते की, त्यांच्याकडे लाल डायरी आहे, ज्यामध्ये अशी अनेक गुपिते आहेत, ज्यामुळे अशोक गेहलोत यांना तुरुंगात टाकता येईल. त्याचबरोबर डायरीमध्ये राजकीय फायद्यासाठी आमदारांना आमिष दाखवणे, क्रिकेट निवडणुकीत पैसे देणे, घोडे बाजार करणे, वेळेप्रसंगी लोकप्रतिनिधींना खरेदी करणे अशा कृत्यांचा लेखाजोखा असल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे काँग्रेस फुटणार आणि अनेक आमदार महायुतीत सामील होणार असा दावा अनेकवेळा करण्यात आला होता. त्यामुळे महाराष्ट्रातील नाही पण राजस्थानातील आमदार गळाला लावण्यात महायुतीला यश आले आहे. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेनेचे राजस्थान राज्यप्रमुख लाखनसिंह पवार, ओमसिंह चारण, श्यामप्रताप सिंह, प्रतापसिंह चौहान आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान राजस्थानच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून लाल डायरीची चर्चा भलतीच रंगली आहे. त्यामुळे राजस्थानच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

राजेंद्र सिंह गुढा यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात लोक जनशक्ती पक्षातून झाली. यानंतर २००८ मध्ये त्यांनी बसपामध्ये प्रवेश केला. पण त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नंतर त्यांनी २०१३ ची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली. मात्र, त्यांचा पराभव झाला. २०१८ मध्ये गुडा यांनी काँग्रेस सोडली आणि पुन्हा बसपामध्ये प्रवेश केला. त्यानंतर परत त्यांनी बसप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!