Latest Marathi News
Ganesh J GIF

उपमुख्यमंत्र्यांच्या अष्टपैलू पत्नीचा अमेरिकेत दिसला जलवा

टाइम्स स्क्वेअरमध्ये घुमला 'सारे जहासे'चा जयघोष, या कामगिरीबद्दल झाला गाैरव, व्हिडिओ व्हायरल

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा त्या चर्चेत आल्या आहेत. कारण त्यांचा थेट अमोरिकेत सत्कार करण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांचा आवाजही तिथे घुमला आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त न्यूयॉर्कमधील जगप्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे यावेळी त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. एक बँकर असलेल्या अमृता या गायन क्षेत्राबरोबरच सामाजिक सेवा, महिला सबलीकरण क्षेत्रातही आघाडीवर असल्याबद्दल हा सत्कार करण्यात आला. न्यूयॉर्कच्या महापाैरांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांनी गायलेले सारे जहासे अच्छा हे गीताची लोकांनी भरपूर प्रशंसा केली. त्यांच्या गायनाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर भारताच्या ‘चांद्रयान ३’ चे यशस्वी लँडिंगचे यश साजरे करण्यासाठी २७ आणि २९ ऑगस्ट रोजी न्यू यॉर्कमध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अमृता फडणवीस प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या होत्या. विशेष कार्यक्रमाला तेथील भारतीय नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती. त्याचबरोबर कार्यक्रमात न्यूयॉर्कमधील भारताचे कॉन्सिल जनरल रणधीर जैसवाल, डेप्युटी कमिशनर दिलीप चौहान हे विशेष अतिथी म्हणून आले होते. दरम्यान त्यांच्या गाण्यावर विविध प्रतिक्रिया समाजमाध्यमात उमटत आहेत. ‘नाविका कॅपिटल’चे नवीन शाह आणि ‘रॉयल अल्बर्ट पॅलेस’चे अल्बर्ट जसानी हे या प्रतिष्ठित कार्यक्रमाचे होस्ट होते.

बँकर असलेल्या अमृता फडणवीस यांनी आतापर्यंत अनेक गाणी गायली आहेत. त्यांचे स्वतंत्र अल्बमही आले असून अनेक सार्वजनिक कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला आहे. तसेच त्या त्यांच्या प्रतिक्रियांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांना अनेकदा ट्रोल देखील करण्यात येत असते. तरीही त्या आपण गात राहणार असल्याचे त्यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!