Latest Marathi News
Ganesh J GIF

या प्रसिद्ध अभिनेत्रीने चाहत्यांना दिली गुडन्युज

पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त म्हणाली आम्हाला आमच्या आनंदाचा खरा अर्थ कळला

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- ‘बिग बॉस ७’ची विजेती आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान सध्या खुपच आनंदात आहे. गौहर खान आणि तिचा पती जैद दरबार यांनी त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. गौहर खानने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे.


गौहर खानने १० मे रोजी मुलाला जन्म दिला आहे. गौहर खानने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “अस्सलामुआलाइकुम आमचा आनंदाचा बंडल आम्हाला आनंदाचा खरा अर्थ काय आहे हे समजण्यासाठी आला आहे.” या चिठ्ठीत अभिनेत्रीने प्रेम आणि प्रार्थनांसाठी सर्वांचे आभार मानले आहेत. जैद दरबार आणि गौहर खान यांचे २०२० मध्ये लग्न झाले होते. त्याचवेळी लग्नाच्या जवळपास तीन वर्षांनी त्यांच्या आयुष्यात हा मोठा आनंद आला आहे. अभिनेत्रीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये एका सोशल मीडिया पोस्टद्वारे गर्भधारणेची घोषणा केली होती. तेव्हापासून तिच्यावर सतत गरोदरपणाचा बोलबाला होता. सोशल मीडियावर ती अनेकदा तिच्या बेबी बंपचे फोटो शेअर करत होती.

गौहर खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केलं आहे. ती नेहमीच चर्चेत असते. गौहर खान नुकतीच नेटफ्लिक्सवर ‘१४ फेरे की कहानी’ या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!