Latest Marathi News
Ganesh J GIF

बाॅलीवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्रीला होणार अटक

अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल, न्यायालयाने बजावली नोटीस, अभिनेत्रीला धक्का म्हणाली मला सांगितले की मुख्यमंत्री..

मुंबई दि १८(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये सध्या काही कलाकार अडचणीत आले आहेत. त्यातच आता एका अभिनेत्रीविरोधात अटक वाॅरंट जारी करण्यात आले आहे. तपास अधिकाऱ्याने जरीनविरुद्धच्या खटल्याचे आरोपपत्र कोलकात्याच्या सियालदह न्यायालयात सादर केले आहे. कोर्टात सतत हजर न राहिल्यामुळे त्याच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.

बाॅलीवूड अभिनेत्री जरीन खानविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २०१६ मध्ये एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने कोलकाता येथे ६ कार्यक्रमांना उपस्थित न राहिल्याबद्दल अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाची माहिती देतानस पोलिसांनी सांगितले की, झरीनविरुद्ध कोलकात्याच्या सियालदह न्यायालयात आरोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, झरीनने जामिनासाठी अर्ज केला नसून ती अजून न्यायालयातही हजर राहिली नाही. ती न्यायालयाच्या नियमाप्रमाणे सतत हजर न राहिल्यामुळे तिच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आला आहे. या प्रकरणी आपली बाजू मांडताना जरीनने असेही सांगितले होते की, तिच्या आणि आयोजकांमध्ये विमान तिकीट आणि राहण्याच्या व्यवस्थेवरून वाद झाला होता, त्यानंतर तिने यात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. जरीनने स्थानिक न्यायालयात आयोजकांविरुद्ध दिवाणी खटला दाखल केला आहे. अटक वॉरंटबद्दल बोलताना सांगितले की, तिच्याकडे याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. ती म्हणाली, “मला खात्री आहे की यात काही तथ्य नाही. मलाही धक्का बसला आहे आणि मी माझ्या वकिलाकडे तपास करत आहे. त्यानंतरच मी तुम्हाला काही स्पष्टीकरण देऊ शकेन. असे जरीन खान म्हणाली आहे.

जरीन खानने सलमान खानच्या वीर चित्रपटातून बाॅलीवूडमध्ये प्रवेश केला होता.कतरिना कैफशी साम्य असल्यामुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती रेडी, हाऊसफुल २, हेट स्टोरी ३, अक्सर २ आणि चाणक्य यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. २०२१ मध्ये आलेल्या हम भी अकेले तुम भी अकेले या चित्रपटात तीने शेवटचे काम केले. सध्या जरीन बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!