‘या’ भारतीय क्रिकेटपटूवर पत्नीचा विवाहबाह्य संबंधाचा आरोप
अटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव, पत्नीच्या दाव्यामुळे खळबळ, वाद काय?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहॉं यांनी मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.हसीन जहाँने त्याच्यावर गंभीर आरोप लावत त्याच्या अटकेची मागणी केली आहे.
मोहम्मद शमी विरोधात स्थानिक न्यायालयाने जारी केलेल्या अटक वॉरंटवरील स्थगिती उठवण्याची मागणी करणारी याचिका शमीच्या पत्नीने केली होती. मात्र, ही याचिका फेटाळून लावण्यात आल्यानंतर पत्नीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पत्नी हसीन जहाँने शमीवर आरोप केले आहेत. तिच्या आरोपांनुसार, शमीचे विवाहबाह्य संबंध होते आणि तो हुंड्यासाठी तिचा छळही करायचा. जानेवारीमध्ये कोलकाता उच्च न्यायालयाने मोहम्मद शमीला पत्नीला दरमहा १.३० लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते. भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा खेळाडू मोहम्मद शमीच्या पत्नीने तिचे वकील दीपक प्रकाश, अॅडव्होकेट-ऑन-रेकॉर्ड, नचिकेता वाजपेयी आणि दिव्यांगना मलिक वाजपेयी, वकिलांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हसीन जहाँने आरोप केला आहे की, भारतीय दौऱ्यावर बीसीसीआयने दिलेल्या हॉटेल रूममध्ये शमीने वेश्यांसोबत अवैध संबंध ठेवायचा. शमी जेव्हा परदेश दौऱ्यावर असायचा तेव्हा तो मुलींना बीसीसीआयने दिलेल्या हॉटेलच्या रूममध्ये बोलावत असे. तो आजही वेश्यांसोबत बोलतो, त्यांच्या सोबत संबंध सांभाळण्यसाठी तो दुसऱ्या मोबाईल नंबरचा वापर करतो, असा दावा तिने केला आहे.
शमीची माजी पत्नी हसीन जहाँने शमीवर त्यांच्या विभक्ततेदरम्यान घरगुती हिंसाचार आणि मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता. याचा परिणाम शमीच्या कारकिर्दीवरही झाला. मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे त्याची बीसीसीआयने चौकशीही केली होती. मात्र काही महिन्यांनंतर शमी निर्दोष सिद्ध झाला होता.