
धनंजय मुंडेच्या खात्याचा कारभार पाहणार हा नेता
धनंजय मुंडेंच्या जागी अजित पवार देणार या नेत्याला संधी, अजित पवार यांची सावध भुमिका?
मुंबई – बीडमधील मस्साजोगचे दिवंगत माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निर्घृणतेची छायाचित्रे समोर आल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना नुकताच आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे रिक्त पदासाठी या नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत.
धनंजय मुंडे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर संजय बनसोडे यांचे नाव चर्चेत आले आहे. राष्ट्रवादीमधून निवडून आलेले लोह्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनाही संधी मिळू शकेते. रिक्त जागा भरताना मराठवाड्यातून वजा झालेले मंत्री पद याच भागात राहावे, यासाठी नेत्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांच्यासह विधान परिषदेतील आमदार सतीश चव्हाण यांनी आपली वर्णी लागावी, यासाठी पाऊले उचण्यास सुरुवात केली आहे. धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळांची सरकारमध्ये एन्ट्री होणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, त्यावेळी छगन भुजबळ यांचा समावेश झाला नव्हता. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. विशेष म्हणजे धनंजय मुंडे यांचे खाते मागील मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांनीच संभाळले होते.
सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे धनंजय मुंडे यांच्या पदाचा कार्यभार अजित पवार यांच्याकडेच राहणार आहे. तसेच विधिमंडळातील प्रश्नावर देखील अजित पवारच उत्तर देणार आहेत.