Latest Marathi News

ही आघाडीची मराठी अभिनेत्री या व्यक्तीला करत आहे डेट

त्या खास व्यक्तीचा फोटो अभिनेत्रीने केला शेअर, चाहत्यांचा सोशल मिडीयावर कल्ला

मुंबई दि १८(प्रतिनिधी) – मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी प्राजक्ता लंडन दाै-यावर गेली होती तेंव्हा तिने शेअर केलेला फोटो पाहून अनेक चर्चांना उधान आले आहे.


प्राजक्ता नेहमी सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. प्राजक्ताने एक फोटो शेअर केला आहे, त्यात ती मिस्ट्री बॉयसोबत कॉफी डेटवर गेल्याचे दिसत आहे. त्या व्यक्तीसोबत तिने फोटो शेअर केला आहे. त्यामुळे हा व्यक्ती नेमका कोण असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तर ती त्या व्यक्तीला डेट करत असल्याची चर्चा रंगली होती मात्र प्राजक्ताने कॅप्शनमध्ये तो तिचा चाहता असल्याचे स्पष्ट केले आहे., ‘वर्ल्ड फूड डेच्या शुभेच्छा. त्या व्यक्तीचं देखील खूप कौतुक केलं. जो फक्त तुम्हाला पाहण्यासाठी आणि तुमच्यासोबत जेवणासाठी पुणे मुंबई असा प्रवास करतो. खूप खूप धन्यवाद भावा.’ ही पोस्ट जरी जूनी असली तरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे तिच्या या चाहत्याचे नेटक-यांनी मोकळेपणानं काैतुक केले आहे. पण प्राजक्ता खरच सिंगल आहे की रिलेशनमाध्ये याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान प्राजक्ताला सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठ’चा ‘युवा पुरस्कार’ सन्मान देण्यात आला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने हा पुरस्कार स्वीकारतानाचा व्हिडीओ अधिकृत सोशल मीडिया इंस्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून प्राजक्ताच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने विविध मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरिज आणि सूत्रसंचालनाच्या माध्यमातून लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिने सुत्रसंचालक म्हणून एक वेगळी छाप पाडली आहे. आता तर अभिनेत्रीच नव्हे तर ती एक व्यावसायिकाही आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!