Just another WordPress site

ग्रामपंचायत निवडणूकीत या पक्षाची झाली सरशी

पहा ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल एका क्लिकवर

मुंबई दि ५ (प्रतिनिधी)- राज्यात झालेल्या सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यानंतर नवीन सरकारच्या कार्यकाळात पार २७१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीचे निकाल आज लागले आहेत. या निवडणूकीत भाजपाने शिंदे गटाच्या मदतीने घवघवीत यश मिळवले आहे.

GIF Advt

एकूण २७१ पैकी तब्बल १०० हून अधिक ग्रामपंचायतींवर भाजपा आणि शिंदे गटाचा विजय झाल्याचं दिसून येत आहे. २७१ पैकी भाजपानं ८२ तर शिंदे गटाने ४० हून अधिक ग्रामपंचायतींवर झेंडा फडकवला आहे. तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादीला सर्वाधिक फायदा झाला आहे. राज्यात ५३ ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेल जिंकून आले आहेत.शिवसेना मात्र चाैथ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. आज लागलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात भाजपा ८२, राष्ट्रवादी ५३, शिंदे गट ४०, शिवसेना २७, काँग्रेस २२ तर इतरांना ४७ जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे गटाने मराठवाड्यात अभूतपूर्व यश मिळवलं आहे.

शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर पहिल्याच निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाला बोलबाला पाहायला मिळाला आहे. चिंचपूरच्या या निकालामुळे भाजपाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांना मोठा धक्का मानला जात आहे. औरंगाबादेत शिंदे गटाचे वर्चस्व पाहायला मिळालं. याठिकाणी शिंदे गटात सहभागी होणाऱ्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निकालांकडे सगळ्यांचे लक्ष होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!