Latest Marathi News
Ganesh J GIF

टीम इंडियाचा हा स्टार बाॅलर या तरुणीकडून क्लिनबोल्ट

साखरपुड्याचे फोटो समोर, इंग्लड सिरिजनंतर अडकणार विवाहबंधनात, कोण आहे चायनामनचा विकेट घेणारी नवरी

लखनऊ – भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याचा वंशिका नावाच्या मुलीसोबत साखरपुडा पार पडला. आता लवकरच तो लग्नबंधनात अडकणार आहे. तो आपल्या बालमैत्रीणीबरोबर संसार थाटणार आहे.

कुलदीप यादव आणि वंशिकाचा साखरपुडा उत्तरप्रदेशमधील लखनऊमध्ये पार पडला. यावेळी कुलदीपने ऑफ व्हाईट रंगाचा सूट परिधान केला होता, तर वंशिकाने ऑरेंज रंगाचा लेहंगा घातला होता. वंशिका आणि कुलदीप बालपणीचे मित्र आहेत. दोघांच्याही कुटुंबियांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. कुलदीपला त्याच्या नव्या आयुष्यासाठी चाहते आणि मित्रमंडळींकडून शुभेच्छा मिळत आहेत. कुलदीप यादव इंडियन प्रीमियर लीग मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा भाग होता. त्याने आपल्या फिरकी गोलंदाजीने अनेक महत्त्वपूर्ण सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला. पण दिल्ली कॅपिटल्सला या सीझनमध्ये बहुतांश सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. साखरपुड्याच्या कार्यक्रमाला नामांकित क्रिकेटर उपस्थित होते. रिंकू सिंह देखील उपस्थित होता. कुलदीप यादव आणि वंशिका भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेनंतर लग्न करु शकतात. आता भारताचा संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. पाच सामन्यांची कसोटी मालिका २० जूनपासून सुरु होणार आहे. कुलदीप यादवची निवड झालेली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून त्यानं कसोटी मॅच खेळलेली नाही. कुलदीप यादवनं १३ कसोटीत ५६ विकेट घेतल्या आहेत. रिंकू सिंहची होणारी पत्नी आणि खासदार प्रिया सरोज यांनी कुलदीप- वंशिका सोबतचा एक फोटो X वर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले आहे, ”जन्मोजन्मी बंधनात अडकणाऱ्या कुलदीप भैया आणि वंशिकाचे मनापासून अभिनंदन!.” अशा शब्दात शुभेच्छा दिल्या आहेत. कुलदीप भारतीय क्रिकेटचा ‘चायनामन’ म्हणून ओळखला जातो.

कानपूरची रहिवासी असलेल्या वंशिका हिचे वडील भारतीय जीवन विमा निगम मध्ये कार्यरत आहे. भारत क्रिकेट टीम लवकरच इंग्लंड दौऱ्यासाठी उड्डाण करणार आहे. टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर पाच टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. ही टेस्ट सीरिज आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!