Latest Marathi News
Ganesh J GIF

यंदा बारावीचा निकालात मुलींचीच बाजी, निकाल ९१.२५ टक्के

मुलांपेक्षा मुलीच हुशार, कोकण विभागाची निकालात बाजी, बघा यंदाच्या निकालाची वैशिष्ट्ये

पुणे दि २५(प्रतिनिधी)- अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणाऱ्या १२ वीचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. राज्यात कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे.

यंदा राज्याचा १२ वी बोर्डाचा निकाल ९१.२५ टक्के लागला आहे. याशिवाय यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारल्याचं पाहायला मिळत आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा निकाल ४.६९ टक्क्यांनी अधिक लागला आहे. तर दिव्यांग श्रेणीत ९३ टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. बोर्डाकडून निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. शरद गोसावी म्हणाले की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल दुपारी जाहीर करणार आहे. उत्तीर्ण विद्यार्थांचं अभिनंदन करतो. राज्यातील कॉपीमुक्त अभिनयानाची अंमलबजावणी करण्यात आली. यंदा १४,१६,३७१ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली आहे. त्यापैकी १२९२४६८ विद्यार्थ्यी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील नऊ विभागांपैकी सर्वाधिक निकाल हा कोकण विभागाचा ९६.०१ टक्के तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी दोन वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच, विद्यार्थी आपला निकाल डाऊनलोड करून प्रिंटही काढू शकणार आहेत.

१२ वीच्या निकालाची विभागनिहाय टक्केवारी
कोकण- ९६.०१
पुणे -९३.३४
अमरावती- ९२.७५
कोल्हापूर- ९२.२८
छत्रपती संभाजीनगर- ९१.८५
नाशिक- ९१.६६
लातूर- ९०.३७
नागपूर- ९०.३५
मुंबई- ८८.१३

बारावीचा शाखानिहाय निकाल
कला – ८४.०५ टक्के
विज्ञान – ९६.०९ टक्के
वाणिज्य – ९०.४२ टक्के
व्यवसाय अभ्यासक्रम – ९१.२५ टक्के

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!