‘मला तिची अंतर्वस्त्रे पाहायची आहेत, नाहीतर चित्रपट…’
प्रसिद्ध अभिनेत्रीचा दिग्दर्शनकावर गंभीर आरोप, सांगितली बाॅलीवूडची काळी बाजू
मुंबई दि २४(प्रतिनिधी)- प्रियांका चोप्राने तिच्या अभिनयाच्या आणि कौशल्याच्या जोरावर स्वतःचे नाव कमावले आहे. पण बाॅलीवूडमध्ये सेट झाल्यानंतर प्रियांका चोप्राने चित्रपटसृष्टीत अनेक मोठे खुलासे केले आहेत.प्रियंका चोप्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे. यामुळे पुन्हा एकदा बॉलीवूड हादरले आहे.
प्रियांका चोप्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत २००२ ते २००३ मधील या घटनेचा खुलासा केला आहे. प्रियांका चोप्रा म्हणाली की, ही घटना 2002 किंवा 2003 सालची आहे. एका चित्रपटात अंडरकव्हर एजंटची भूमिका करत होते. एका सीनमध्ये मला एका माणसाला सिड्यूस करायचे होते. यासाठी मला एक एक करून माझे कपडे काढायचे होते. त्यामुळे मला सीनसाठी जास्तीत जास्त कपडे घालायचे होते. पण त्यावेळी दिग्दर्शकाने प्रियंका चोप्राच्या स्टायलिशला सांगितले की, प्रियंका चोप्राचे कपडे नाही तिची अंतर्वस्त्रे दाखवायची आहेत, नाहीतर चित्रपट बघायला कोण येईल? तो इतका अमानवी क्षण होता, माझ्या टॅलेंटचा काही उपयोग नाही हे मला त्यावेळी जाणवले. दोन दिवस काम केल्यानंतर प्रियंका चित्रपटातून बाहेर पडली आणि त्यांचे पैसे परत केले, असे तिने सांगितले. त्यावेळी प्रियांका चोप्रा म्हणाली, अशा घाणेरड्या माणसाचा चेहरा पाहून मी रोज काम करू शकत नाही. त्यापेक्षा चित्रपट सोडलेला बरा. अशी भावना तयार झाली असेही प्रियंका चोप्रा म्हणाली आहे.
प्रियांकाने २००२ मध्ये तमिळ चित्रपट ‘थमिझन’मधून तिच्या अभिनय करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर 2003 मध्ये ‘अंदाज’मधून त्याने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. तसेच प्रियांका नुकतीच अॅमेझॉनच्या वेब सीरिज ‘सिटाडेल’ आणि रोमँटिक ड्रामा फिल्म ‘लव्ह अगेन’मध्ये दिसली होती. याशिवाय ती फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’मध्ये कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.