Latest Marathi News

शैलेश नरेकर, लक्ष्मण काशीद यांना यंदाचा शौर्य पुरस्कार

ब्रिगेडियर सुनील लिमये (निवृत्त) यांची उपस्थिती ; जाधवर ट्रस्टतर्फे आयोजन

पुणे दि (प्रतिनिधी)-  समाजात शौर्य गाजवित अचंबित करणारी कामगिरी करणा-या पुण्यातील पोलीस नाईक शैलेश नरेकर व पोलीस हवालदार लक्ष्मण काशीद यांना यंदाचा शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. न-हे येथील डॉ.सुधाकरराव जाधवर सोशल अ‍ँड एज्युकेशनल ट्रस्टतर्फे स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शौर्य पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार, दिनांक १३ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम  पार पडला, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड.शार्दुल जाधवर यांनी दिली.

कार्यक्रमाला ब्रिगेडियर सुनील लिमये (निवृत्त), शैलेश संखे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, यंदाचा शौर्य पुरस्कार पोलीस नाईक शैलेश नरेकर व पोलीस हवालदार लक्ष्मण काशीद यांना प्रदान करण्यात आला आहे. शहरात झालेल्या छोटया-मोठया आपत्तींमध्ये त्यांनी नागरिकांना मदतीचा हात दिला आहे. तसेच पोलीस क्षेत्रात कार्यरत असताना समाज सुरक्षेबाबत देखील अत्यंत जागरुकपणे कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे.तसेच त्यांनी यापुढेही अशीच कामगिरी करत रहावी अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!