भारताची ही तरुणी ठरली यंदाची मिसेस वर्ल्ड २०२२ ची मानकरी
भारताने २१ वर्षानंतर जिंकला मिसेस वर्ल्डचे विजेतेपद,देशात जल्लोष
मुंबई दि १८ (प्रतिनिधी)- भारताच्या मुलीने पुन्हा एकदा चमत्कार करत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. मुंबईतील रहिवासी असलेल्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड २०२२ स्पर्धा जिंकून भारतीयांचा अभिमान वाढवला आहे. या स्पर्धेत ६३ देशांतील स्पर्धकांचा सहभाग होता. त्यात सरगमने बाजी मारली आहे. तिच्या विजयामुळे २१ वर्षांनंतर हे विजेतेपद परत एकदा भारताला मिळाले आहे.
भारतीय तरुणी सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड विजेतेपद पटकावले आहे. या आधी २००१ मध्ये अभिनेत्री-मॉडेल आदिती गोवित्रीकरने विजेतेपद पटकावले होते. मिसेस वर्ल्ड २०२२ कार्यक्रम वेस्टगेट लास वेगास रिसॉर्ट आणि कॅसिनो येथे आयोजित करण्यात आला होता. मागची वर्षीची अमेरिकेच्या मिसेस वर्ल्ड शायलिन फोर्ड यांच्या हस्ते सरगम कौशलला मुकुट घातला गेला.मिसेस पॉलिनेशियाला फर्स्ट रनर अप आणि मिसेस कॅनडाला ‘सेकंड रनर अप’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. या यशानंतर बोलता.अ सरगम काैशल म्हणाली की, “आम्हाला २१-२२ वर्षांनी हा मुकुट परत मिळाला आहे, त्यामुळे मी खूप उत्साहित आहेत. भारतावर प्रेम करा, जगावर प्रेम करा. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान मिसेस इंडिया स्पर्धेनेही त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.
सरगम कौशल या आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे शिक्षिका होत्या. सरगमने इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. आणि तिचा नवरा भारतीय नौदलात काम करतो. सरगमने यंदाची मिसेस इंडिया वर्ल्ड स्पर्धा जिंकल्यामुळे ती जागतिक स्पर्धेसाठी पात्र ठरली होती.