नाशिकमध्ये देवदर्शनासाठी जाताना रस्त्यावरच बर्निंग कारचा थरार
गाडी पूर्णपणे जळून खाक,जिवीतहानी टळली, व्हिडिओ व्हायरल
नाशिक दि २७(प्रतिनिधी)- सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांची गाडी आगीत जळून खाक झाल्याची घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. वणी गडावर जात असताना वनारवाडी फाट्याजवळ कार मधून अचानक धूर येत असल्याने गाडी मालकाने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि क्षणात गाडीने पेट घेतला हा बर्निंग कारचा थरार कॅमे-यात कैद झाला आहे.
योगेश प्रकाश गिरासे आपल्या कुटुंबासह वणीला देवीच्या देवाच्या दर्शनाला जात होते. पण अचानक वनारवाडी फाट्याजवळ कार मधून धुर येऊ लागल्याने त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली.गाडीत बसलेले सर्वजण बाहेर पडताच क्षणात गाडीने पेट घेतला. परिसरातील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अपयशी ठरला आणि गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. पण सुदैवाने जिवितहानी टळली आहे. या घटनेची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेमुळे काही काळ वाहतूक रेंगाळली होती.
नाशिकमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.या महिन्यात शिंदे पळसे टोल नाक्याजवळ बसने दुचाकीला धडक दिल्याने एसटीबसला लागलेल्या आगीत होरपळून दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता तर एक जण गंभीर जखमी झाला होता. पण आजच्या घटनेत कारमधील प्रवासी वेळेवर खाली उतरले असल्याने मोठा अनर्थ टळला आहे.