Latest Marathi News
Ganesh J GIF

‘टायगर अभी जिंदा है ओैर बढ रहा है!’

पंतप्रधान मोदींकडून वाघांची आकडेवारी जाहीर, भारतात आहेत 'इतके' वाघ

दिल्ली दि ११(प्रतिनिधी)- भारतातील व्याघ्रगणनेचा अहवाल जाहीर झाला असून भारतातील वाघांची संख्या २०२३ वरुन ३,१६७ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिन्याच्या सुरुवातीला ‘प्रोजेक्ट टायगर’ ला ५० वर्ष पूर्ण झाल्याबाबत भारतातील व्याघ्रगणनेचा अहवाल प्रकाशित केला. भारताचा राष्ट्रीय प्राणी असणाऱ्या रुबाबदार वाघाची संख्या वाढल्याने वन्यप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

नवीन आकडेवारीनुसार, देशातील वाघांची संख्या २,९६७ वरुन ३,१६७ वर पोहोचली आहे. २००६ मध्ये वाघांची संख्या १,४११ तर २०१० मध्ये १,७०६ होती ती २०१४ मध्ये २,२२६ वर पोहोचली होती. तर २०१८ मध्ये ती संख्यस २,९६७ इतकी होती. यात महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने मध्य भारतातील भूप्रदेश व पूर्वघाटावर ११६१ वाघ असल्याचे घोषित केले आहे. २०१८ मध्ये ही आकडेवारी १०३३ होती. तेव्हा २० ते २२ टक्के वाढ होऊन राज्यात ३०२ वाघांची नोंद झाली होती. देशात सरासरी १२ ते १७ टक्के वाघांची वाढ झाल्याचा अंदाज आहे. राज्यात सहा व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यावरून राज्यात ३६० ते ३६५ वाघ असल्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक २०० पेक्षा अधिक वाघ आहेत. २०२२ मध्ये झालेल्या प्रगणनेनुसार ही आकडेवारी पुढे आली आहे. २००६ ते २०२० पर्यंत दरवर्षी राज्यात २० ते २५ टक्के वाघांची संख्या वाढलेली आहे. दरम्यान पंतप्रधान मोदीं यांनी अमृतकाळा दरम्यान वाघांच्या संवर्धनासाठी सरकारचा दृष्टीकोन देखील प्रकाशित केला. तसेच ‘आंतरराष्ट्रीय बिग कॅट्स अलायन्स’ची देखील सुरुवात केली. ‘प्रोजेक्ट टायगर’ला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ नाण्याचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले आहे.

भारतात १ एप्रिल १९७३ ला इंदिरा गांधी यांनी प्रोजेक्ट टायगर सुरू केला होता. वाघ वाचवण्यासाठी ही मोहीम होती. कारण तेव्हा भारतात फक्त २६८ वाघ उरले होते. १९ व्या शतकाच्या सुरूवातीला भारतात तब्बल ४० हजार वाघ होते. मात्र १९७३ मध्ये ही संख्या २६८ इतकीच उरली होती. त्यामुळे ही संख्या वाढवण्यासाठी टायगर प्रोजेक्ट सुरू करण्यात आले होते.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!