Latest Marathi News
Ganesh J GIF

देवेंद्र फडणवीस पुन्हा होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?

भाजपाच्या त्या व्हिडीओची जोरदार चर्चा, महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप, एकनाथ शिंदेचे पद जाणार?

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेली अनपेक्षित घडामोडींची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात दिवाळी आधीच राजकीय फटाके फुटणार आहेत. कारण सरकारमधील मोठा पक्ष भाजपाने एक व्हिडिओ पोस्ट तसे संकेत दिले आहेत.

भाजपने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘महाराष्ट्राच्या निवनिर्मितीसाठी मी पुन्हा येईन’ अशा आशयाचा देवेंद्र फडणवीसांचा एक व्हिडिओ महाराष्ट्र भाजपाच्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार? अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे. कारण दोन दिवसापूर्वी फडणवीस आणि शिंदे यांनी अचानक दिल्लीचा दाैरा केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांवर सुरु असलेली अपात्रतेची कारवाई आणि मराठा समाजाच्या वाढता असंतोष यामुळे शिंदे कमालीचे अडचणीत आले आहेत. मराठा चेहरा म्हणून भाजपाने शिंदे यांना प्रमोट केले होते. पण शिंदे आपली तशी प्रतिमा निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत. त्यातच लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे नाराजीचा फटका टाळण्यासाठी पुन्हा एकदा फडणवीस यांना मुख्यमंत्री केली जाण्याची जास्त शक्यता आहे. कारण भाजपाने महाराष्ट्रात मिशन ४५ चे लक्ष्य ठेवले आहे. पण मराठा समाजासह सर्वच समाज आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. याचा फटका भाजपाला बसू शकतो. त्यामुळे भाजपाकडुन राज्यात मोठे फेरबदल केले जाणार आहेत. त्यामुळे फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात. पण विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय पुनर्वसन कसे होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान राज्यात सध्या महायुतीचे सरकार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे.

सुरूवातीला एकनाथ शिंदे अपात्र ठरणार आणि अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु झाली होती. पण फडणवीस यांनीच अजित पवार यांना पूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री करु असे म्हणत चर्चांना पूर्णविराम दिला होता. पण आता नवा व्हिडिओ शेअर करत भाजपाने बदलाचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात काय राजकीय घडामोडी घडणार हे पहावे लागेल.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!