बाॅलीवूडध्ये चित्रपट मिळवण्यासाठी तुम्हाला झोपावे…
प्रसिद्ध अभिनेत्रीने मांडली बाॅलीवूडमधील काळी बाजू, या दिग्दर्शकावर केले होते गंभीर आरोप
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- बाॅलीवुडची चंदेरी दुनिया जितकी भुरळ घालणारी आहे. तितकीच ती भयानक आहे. चित्रपटासाठी अनेकजण आपल्या ताकतीचा फायदा घेत अनेकांचे शोषण करत असतात. त्यात अभिनेत्री होण्यासाठी आलेल्या मुलींना कास्टिंग काऊचचा सामना करावा लागतो. यावर काहीजण व्यक्त होतात. तर काहीजण गप्प राहतात. पण सध्या एका अभिनेत्रीने खळबळ उडवून देणारे विधान केले आहे.
अभिनेत्री पायल घोष हे हिंदी आणि तेलगू चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. पायलने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करताना इंडस्ट्रीतील कास्टिंग काउचबद्दल खुलासा केला आहे. तिने या पोस्टमध्ये खुलासा केला आहे. आपल्या अकराव्या चित्रपटाची घोषणा करताना ती म्हणाली की, “प्यार की आग: RAID सह, मी माझा ११ वा चित्रपट पूर्ण करणार आहे. जर मी झोपले असते, तर मी आज माझा ३० वा चित्रपट पूर्ण केला असता. कॉम्प्रोमाइज करायला नकार दिल्याने अनेक चित्रपट गमावले आहेत.” असे रोखठोक मत तिने मांडले होते. पण ही पोस्ट तिने नंतर डिलीट केली. पायलच्या या पोस्टनंतर अनेक जण तिच्यावर टीका करत आहेत, तर अनेकजण पायलच्या समर्थन करत आहेत. दरम्यान पायलने यापूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपवरही गंभीर आरोप केले आहेत. पायल घोषने अनुराग कश्यपवर बळजबरीने लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप केले होते. यानंतरही पायल चर्चेत आली होती.
अभिनेत्री पायल घोष सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते आणि आपल्या चाहत्यांना प्रत्येक गोष्टीचे अपडेट देत असते. तिचा ‘फायर ऑफ लव्ह रेड’ हा चित्रपट येत्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अभिनेत्री पायल घोषबरोबर कृष्णा अभिषेकने प्रमुख भूमिका साकारली आहे.