बॉलीवूडमध्ये मुस्लीम कलाकारांसोबत भेदभाव होतो?
बाॅलीवूड अभिनेत्रीने मांडले स्पष्ट मत म्हणाली, प्रत्येक सरकारने उत्तरे दिली पाहिजेत..
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- आपल्या सहजसुंदर अभिनयाने छाप माडणारी हुमा कुरेशी ही बॉलिवूडची अभिनेत्री आहे, तिने वेगवेगळ्या भुमिकेतून, व्यक्तिरेखांमधून लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. ‘गँग्स ऑफ वासेपूर’पासून ती सतत चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे. यावेळी ती बाॅलीवूडमधील हिंदु मुस्लिम कलाकारांसोबत होणाऱ्या भेदभावाबद्दल मत मांडले आहे.
पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या पहिल्या राज्य भेटीदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भारतात अल्पसंख्याकांविरूद्ध भेदभाव होत असल्याचा इन्कार केला होता. “लोकशाही हा भारताचा आत्मा आहे, तो तेथील लोकांच्या नसात चालतो आणि ते त्यांच्या दैनंदिन जीवनात लोकशाही जगतात” असे मोदी म्हणाले होते. यावर एका वृत्त वाहिनीला मुलाखत देताना हुमाने याविषयी आपले मत मांडले आहे ती म्हणाली की, आजही जेव्हा अशा गोष्टी बोलल्या जातात, तेव्हा लोक असं नेमकं का बोलतात? असा प्रश्न मला पडतो.’भारतात राहत असताना मला कधीच वाटलं नाही की मी मुस्लीम आहे, मी वेगळी आहे. माझे वडील गेली ५० वर्षे ‘सलीम’ नावाचे रेस्टॉरंट चालवत आहेत. वैयक्तिकरित्या मला असं कधीच वाटलं नाही, परंतु काही लोकांना वाटू शकतं. त्यामुळे प्रश्न विचारले पाहिजेत आणि प्रत्येक सरकारने उत्तरंही दिली पाहिजेत.” असे मत मांडले.
अभिनेत्री हुमा कुरेशी हि तिच्या नुकत्याच रिलिज झालेल्या ‘तरला’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित होम शेफ तरला दलालच्या यांच्या आयुष्यावर आधारित जीवनपट आहे. यामध्ये हुमा कुरेशीने मुख्य भूमिका साकारली आहे.