Latest Marathi News
Ganesh J GIF

सरकारी कर्मचाऱ्याकडून लाच घेताना वाहतूक पोलीस अटकेत

लाच घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, गमवावी लागली नोकरी

नागपूर दि २६(प्रतिनिधी)- नागपूरमध्ये एका वाहतूक पोलिसाला लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.पोलिसाचा लाच घेताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडिओनंतर या पोलिसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संत तुकडोजी महाराज चौकात ही घटना घडली आहे.

तुकडोजी चौकातील वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियम तोडणाऱ्या काही वाहनचालकांना थांबवले. त्यामध्ये एक सरकारी महिला कर्मचारी होती. तिला वाहतूक पोलिसाने चालन करण्याची तंबी देऊन तीनशे रुपयांची लाच मागितली. त्यावेळी वाहतूक नियम तोडणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीने त्यांचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडिओमुळे वाहतूक पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलिस उपायुक्त चेतना तिडके यांनी त्यस वाहतूक पोलिसाला तडकाफडकी निलंबित केले आहे. दरम्यान याआधीही पोलिसांचे लाच घेतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

नागपूरात काही दिवसापूंर्वी वाहनाची जप्ती टाळण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस शिपायाने ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!