Latest Marathi News

गद्दारांना अपेक्षा मंत्रीपदाची, मिळाला बाबाजीचा ठुल्लू

आदित्य ठाकरेंनी घेतला बंडखोर आमदारांच्या निष्ठेचा क्लास

जळगाव दि २०(प्रतिनिधी)- शिवसेनेसोबत गद्दारी करून ४० आमदार एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. मंत्रीपद मिळेल चांगलं खाते मिळेल अशी अपेक्षा गद्दारांना होती. मात्र, यांना काय मिळालं तर ‘बाबाजीचा ठुल्लू’, असं म्हणत युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर टिका केली. आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे पार पडली. या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्याकडून आदित्य ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

अदित्य ठाकरे यावेळी म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका कार्यक्रमात म्हणाले की ५० थरांचे दहीहंडी फोडली ५० थरांची दहीहंडी फोडली की ५० इतर काही घेतलं. ५० खोके यांनी घेतले मलाई यांनी खाल्ली मात्र सामान्य जनतेला काय मिळालं तर काहीच नाही, असं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना सोडून गेलेल्या गद्दारांना मंत्रीपद मिळेल, चांगलं खाते मिळेल, अशी अपेक्षा या होती मात्र यांना काय मिळालं तर बाबाजीचा ठुल्लू.काही गद्दारांना असं वाटत असेल की शिवसेनेसोबत कोणी नाही. त्यात त्यांनी आता या ठिकाणी यावे आणि ही गर्दी पहावी की आजही किती लोक शिवसेनेसोबत आहेत. हे तुमचं प्रेम तुमच्या शुभेच्छा आशीर्वाद घ्यायलाच मी आलो आहे अशा शब्दात त्यांनी बंडखोरांचा समाचार घेतला.यावेळी त्यांनी आगामी विधानसभेचे देखील बिगुल फुंकले आहे.

आगामी काळात शिवसेनेकडून वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात येईल असे संकेत आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच एक संपूर्ण दिवस पुन्हा या वैशाली ताईसाठी पाचोर्‍यात यावे लागेल अदे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे पाचो-यात बीडप्रमाणे भाऊ विरूद्ध बहीण अशी लढत होण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!