Latest Marathi News
Ganesh J GIF

पुण्यात भरधाव डंपर दुचाकीवर पलटल्याने दोन तरुणींचा चिरडून मृत्यू

अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, ३२ टन सिमेंटखाली दबल्याने तरुणींच्या मृतदेह बघवेना

पुणे – पुण्यात मागील काही दिवसापासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हिंजवडीत असाच एक भीषण अपघात झाला असून यात दोन तरुणींचा मृत्यू झाला आहे. भरधाव जाणारा रेडिमिक्स डंपर वळण घेताना अचानक पलटी होऊन दुचाकीवर पडल्याने दोन विद्यार्थिनी डंपरखाली चिरडल्या गेल्या. यातच त्यांचा मृत्यू झाला.

प्रांजली महेश यादव (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळूंगे, ता. मुळशी, मुळ – टेंभूर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) आणि अश्लेषा नरेंद्र गावंडे (वय २२, रा. गोदरेज प्रॉपर्टीज, म्हाळूंगे, ता. मुळशी, मुळ – शेगाव, रहाटगाव रोड, अमरावती) अशी मृत्युमुखी पडलेल्या दोन विद्यार्थिनींची नावे आहेत. प्रांजली आणि अश्लेषा या एमआयटी कॉलेजध्ये विज्ञान शाखेत शेवटच्या वर्षात शिकत होत्या. शुक्रवारी सायंकाळी त्या दुचाकीवरून चालल्या होत्या. हिंजवडी – माण रस्त्यावर वडजाईनगर कॉर्नरजवळ बेदरकारपणे वाहन चालवत भरधाव आलेल्या डंपर चालकाचे वळणावर नियंत्रण सुटले आणि डंपर पलटी झाला. याचवेळी तेथून चाललेल्या दुचाकीस्वार प्रांजली आणि अश्लेषा या डंपरखाली सापडल्या. या भीषण अपघातात दोन्ही तरूणींचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या अपघाताचा व्हिडिओ समोर आला आहे. पलटी झालेल्या डंपरमध्ये तब्बल ३२ टन सिमेंट भरलेले होते. डंपर पलटी झाला आणि ३२ टन सिमेंटच्या बोजाखाली त्या दोघी दबल्या गेल्याने त्यांच्या शरीराचा अक्षरश: चेंदामेंदा झाला होता. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे फावड्याने गोळा करतानाचा प्रसंग खुपच ह्रदयद्रावक होता. दरम्यान डंपर दोन तरूणींच्या अंगावर पलटी झाला, त्यावेळी तेथून एक तरूण दुचाकीवरून चालला होता. मात्र, डंपर पलटी होत असल्याचे पाहताच त्याने दुचाकी सोडून पळ काढला त्यामुळे तो वाचला आहे.

अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. या डंपरमुळे रस्त्यावर काही वेळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. डंपरला रस्त्यावरुन हटवण्यात आल्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
विद्यार्थिनींना उडवणाऱ्या रेडीमिक्स डंपरच्या चालकाने दारू प्यायली होती. पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!