Latest Marathi News
Ganesh J GIF

आजारपणाचे नाटक करणाऱ्या वाल्मिक कराडला मोठा दणका

त्या व्हिडीओमुळे वाल्मिक कराड आणखी गोत्यात, त्या अर्जामुळे वाल्मिक कराड आणि कुटुंबाला धक्का

बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरण-हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात जात आहे. खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात अडचणी वाढत असताना आणखी दणका कराडला बसण्याची शक्यता आहे. कराडला आता आर्थिक दणका बसणार आहे.

वाल्मिक कराडच्या मालकीची सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकाने दाखल केला आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावावर पुणे, बीड यासह विविध भागांमध्ये जमीन, फ्लॅट अशा वेगवेगळ्या मालमत्ता असल्याची माहिती समोर आली होती. या संपत्तीचे आकडे डोके चक्रावणारे होते. मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा संकलित करण्यात आला असून त्यांचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त केल्या जातील, असे सांगितले जात आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम १०७ अंतर्गत अर्ज आधीच न्यायालयासमोर सादर करण्यात आला आहे. जर याला परवानगी मिळाली तर वाल्मिक कराड आणि त्याच्या कुटुंबियांसाठी हा मोठा धक्का ठरु शकतो. दरम्यान वाल्मिक कराड तुरुंगात गेल्यानंतर आता त्याच्या नावावरील मालमत्तांचे हस्तांतरण करण्यास सुरुवात झाल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. बीडमध्ये मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेला दोन महिने होत आले असून यावरुन जोरदार राजकारण देखील रंगले आहे. यामध्ये आरोपी वाल्मीक कराड याला मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र वाल्मीक कराडची प्रकृती बिघडल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र यावरुन संशय व्यक्त केला जात आहे.

वाल्मिक कराड ठणठणीत आहेत. खंडणी मागतांना, जीवे मारण्याच्या धमक्या देतांना, अगदी ठणठणीत होते ना? मग आशांना दया माया कशासाठी? त्यांचे सगळे रिपोर्ट, ब्लड टेस्ट, CT स्कैन आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट सार्वजनिक करा आणि त्यांची सगळ्यांची रवानगी आर्थर रोडला करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी न्यायालयाकडे केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!