Latest Marathi News
Ganesh J GIF

उदयनराजेंनी कार्यकर्त्याला भरवला अशा पद्धतीने पेढा

उदयनराजेंचा 'हा' व्हिडिओ तुफान व्हायरल

सातारा दि १७ (प्रतिनिधी)-उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलमुळे कायमच चर्चेत असतात. कधी दुचाकीवर फिरताय तर कधी कार्यकर्त्यांसाठी पोलिसांशी भिडतात पण काॅलर उठवण्याची स्टाईल जास्त फेमस आहे. यामुळं ते आपल्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. आत्ताही एका कार्यकर्त्यांच्या वाढदिवशीचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.

खासदार उदयनराजे साताऱ्यातल्या गोडोली भागातल्या आपल्या एका कार्यकर्त्याच्या वाढदिवसासाठी गेले होते.तिथे विनोद मोरे नावाच्या एका कार्यकर्त्याचा वाढदिवस त्यांच्या उपस्थितीत साजरा केला. यावेळी त्यांनी मोरे यांचं कौतुक करताना चक्क तोंडाने कार्यकर्त्याला पेढा भरवला. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. राजेंच्या कार्यकर्त्यांनी यावर हटके कमेंट केल्या आहेत. पक्षाच्या बाहेरही उदयनराजे कमालीचे प्रसिद्ध आहेत. पण सध्या सातारा नगरपालिका निवडणूकीवरून. त्यांचे शिवेंद्रराजेबरोबर खटके उडत आहेत.

राष्ट्रवादीतुन दोन वेळा खासदार राहिलेले उदयनराजे भाजपात गेल्यावर मात्र श्रीनिवास पाटील यांच्याकडून पराभूत झाले पण भाजपाने त्यांना राज्यसभेवर संधी दिली आहे. पण राजेंचे कार्यकर्ते कायम राजेंसाठी कायपण अशी भूमिका घेताना दिसून येतात त्यामुळे राजेंच्या हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!