Just another WordPress site

उजनी धरण काठोकाठ भरले, शेतकरी आनंदी

नदीपात्रात पाणी सोडल्याने 'या' गावांना सतर्कतेचा इशारा

पुणे दि १२ (प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग व सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उजनी धरणाने सध्या शंभरीचा टप्पा ओलांडला आहे.धरण १००.५६ टक्के झाले आहे. यामध्ये एकूण पाणीसाठा ११७ टीएमसी झाला आहे. त्यामुळे भीमा नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

GIF Advt

उजनी धरणाचे १६ दरवाजे उघडून त्यामधून २१ हजार ६०० क्यूसेक्स ने नदी पात्रात पाणी सोडण्यात आले आहे. धरणात दौंडमधून ४६ हजार ९३२ पेक्षा जास्त क्युसेकने पाणी धरणात येत आहे. यामुळे उजनी धरणातून अजून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे यामुळे नदीकाठच्या गावांना अधिक सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या धरणातून नदीपात्रासह सीना-माढा उपसा सिंचन योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे. भीमा-सीना जोड कालव्यातून सीना नदीत पाणी सोडले जात आहे. उजनी आतापर्यंत ३० वेळा १०० टक्के भरले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा उजनी लवकर भरले आहे.

पुणे जिल्ह्यातील उजनी आणि भीमा खोऱ्यातील पाणलोट क्षेत्रामध्ये चार दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू असल्याने उजनीच्या वरील धरणांतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे उजनीची पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!