
मुंबई दि १२ (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात शिंदे फडवणीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला. पण नवीन सरकारकडून मंत्र्यांना खाते वाटप होण्याची अगोदरच शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.शिंदे गटातील एका मंत्र्याने भाजपात प्रवेश केला आहे.
शिंदे गट आणि भाजपाकडुन प्रत्येकी ९ जणांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. पण प्रत्येकाकडून महत्वाच्या खात्याचा आग्रह धरला जात आहे. अशा वेळी शिंदे गटाचे संदिपान भुमरे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. गुगलला भुमरे यांचे नाव सर्च केल्यानंतर विकीपीडीयावर त्यांच्या नावापुढे पक्ष म्हणून भाजपाचा उल्लेख आहे. त्यामुळे गुगलला नक्की झालय काय? असा प्रश्न विचारला जात आहे.या आधीही देवेंद्र फडणवीस यांना उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दाखवण्यात आले होते. तर अनेकावेळा देशाच्या नकाशातही फेरबदल करण्यात आले होते. आता शिंदे गटाचे भुमरे भाजपात असल्याचे दाखवण्यात आल्यामुळे चर्चेला उधान आले होते.
शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर अनेकाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. शिंदे यांनी काहीजणांना पुढच्या विस्तारात स्थान देऊ असे आश्वासन देण्यात आले आहे. तर काही नाराजांनी थेट मातोश्रीकडे संपर्क केल्याचा बातम्या आल्याने त्याचीही मोठी चर्चा झाली होती.