Just another WordPress site

बिनधास्त काव्याचे प्रसिद्धीसाठी वाट्टेल ते…

काव्याचा तो बनाव प्रसिद्धीसाठीच, आई वडीलांनीही दिली साथ

ओैरंगाबाद दि २६(प्रतिनिधी)- औरंगाबादमधील फेमस युट्युबर गर्ल बिंदास काव्या काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. बिंदास काव्या अचानक बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली होती. पण आता पोलीसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर नवीनच माहिती समोर आली आहे. पण या कारनाम्यात तिच्या आईवडिलांनी त्याला साथ दिल्याचे समोर आले आहे.

टिक टॉक स्टार काव्या बिनधास्त गायब झाल्याची घटना सोशल मिडीयावर चांगलीच चर्चेत आली होती. मात्र काव्या आणि तिच्या कुटुंबाने फॅन फॉलोअर्स वाढवण्यासाठीच हा खटाटोप केल्याचे समोर आले आहे. कारण सोशल मिडीयावर जेवढे फाॅलोअर्स वाढणार तेवढे पेमेंट वाढणार असा नियम आहे. त्यामुळे हा बनाव केल्याचे समोर आले आहे. घरातून अचानक गायब झालेली काव्या मध्य प्रदेशच्या इटारसी स्टेशनवर सापडली होती.घरच्यांवर नाराज होऊन ती घरातून निघून गेली होती. मात्र, सत्य काही वेगळंच होतं. हे आता समोर आले आहे.या मुळे तिच्या आई वडिलांना अटक होण्याची शक्यता आहे.

GIF Advt

काव्याचे विविध सोशल मिडीया फ्लॅटफार्मवर पाच मिलियनपेक्षा जास्त फॅन फॉलोअर्स आहेत.त्यात या घटनेनंतर प्रचंड वाढ झाली होती.पण दर्जाहीन प्रसिद्धीसाठी शासकीय यंत्रणांना वेठिस धरल्याने संताप व्यक्त होत आहे.बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष अॅड. आशा शेरखाने-कटके यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!