
नव्या नवरीचा मंडपात प्रवेश घेताना अनोखा डान्स
व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल, पाहुणे पाहतच राहिले, नवरीचा अनोखा अंदाज बघाच!
पुणे – लग्न आणि डान्स हे आजकालचे समीकरण बनले आहे. अनेक लग्नात तर नवरा नवरीच डान्स करताना दिसतात. त्याचे व्हिडिओ देखील जोरदार व्हायरल होत असतात. सध्या सोशल मिडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यात नवरीचा उत्साह मोठ्या उंचीवर गेला आहे.
लग्नात नवरा-नवरीच्या एन्ट्रीच्या बाबतीत पूर्वीपेक्षा बरेच बदल झाले आहेत. अगोदर लाजत प्रवेश करणारी नवरी आता मोठ्या थाटात डान्स किंवा हटके स्टाईलने एंट्री करत आहे. सध्या सोशल मिडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तुम्ही पाहू शकता की, लग्न मंडपात वऱ्हाडी मंडळी वधूची वाट पाहात असतात. दरम्यान अचानक “आली ठुमकत नार लचकत’ गाणं वाजू लागतं. गाण्याबरोबरच वधूचे कुटुंबीय एक एक करत नाचत बाहेर येतात. शेवटी वधूची दमदार एन्ट्री होते. गाण्यावर नवरीने केलेला डान्स सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होता. नवरीचा लग्न होत असतानाच आनंद देखील यावेळी दिसत आहे. गावरान तडका या इन्स्टा पेजवर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून अनेकांना तो आवडला आहे. अवघ्या काही दिवसांतच या व्हिडियोला लाखो लाईक्स मिळाले आहेत. एकंदरीत नवरी सोशल मिडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
आजकाल सोशल मिडियावर लग्नातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. खासजकरुन नवरा नवरीचा एकत्र किंवा वेगवेगळा केलेला डान्स देखील व्हायरल होत आहे. अनेकदा त्याला प्रतिसाद देखील मिळत आहे.